स्वस्थ शरीर हवे असेल तर दररोज थोडा वेळ तरी हसलेच पाहिजे...


आजच्या या दगदगीच्या जीवनात मनुष्य शांत आणि स्वस्थ जीवन जगणे विसरून गेला आहे.
आजच्या या दगदगीच्या जीवनात मनुष्य शांत आणि स्वस्थ जीवन जगणे विसरून गेला आहे. काही गोष्टी अश्या आहेत की जर तुम्ही त्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही तुमचे आयुष्य शांत आणि स्वस्थपणे जगू शकाल. स्वतःला स्वस्थ ठेवणे खूप आवश्यक आहे आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे स्वतःला स्वस्थ ठेवणे हे स्वतःच्याच हातात आहे.


मनुष्याला आयुष्य ही देवाने देलेली सुंदर भेट आहे. शरीरासाठी आणि मनासाठी थोडा वेळ काढणे हे खूप आवश्यक आहे. तरुणपणातच या गोष्टीकडे लक्ष दिले तर ठीक आहे, नाहीतर डॉक्टर आणि औषधांवर जीवन जगावे लागेल. त्यासाठी आम्ही एक खूप गमतीदार आणि मजेशीर उपाय सांगत आहोत जो तुम्हाला माहीत पण असेल पण अतापर्यंत तुम्ही त्याचा वापर केलेला नसावा.

सगळ्या आजारांवर एक उपाय आहे मोकळ्यामनाने हसणे. दिवसाची सुरवात करण्यापूर्वी २० मिनिट हसल्याने तुम्ही ताजेतवाने व्हाल. हसल्यामुळे तुम्हे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होइल आणि तुमचा आत्मविश्वास पण वाढेल. हसण्यामुळे तुमचे बरेच आजार चमत्कारिकरित्या नाहीसे होतील. हसण्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मन प्रसन्न राहते.
थोडे नवीन जरा जुने