मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अपघात


बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येदियुरप्पा यांच्या ताफ्यातील एक कार मंगळवारी ट्रक आणि एका ऑटोरिक्षाला जाऊन भिडली. 

यशवंतपूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. मुख्यमंत्री सकाळच्या सुमारास तुमकुरूकडे जात असताना ही दुर्घटना घडली. येदियुरप्पा यांच्या ताफ्यातील कार त्यांचे सचिव एस. सेल्वा कुमार यांना देण्यात आली होती. 

मात्र, दुर्घटनेवेळी ते मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये होते. दुर्घटनेत जखमी झालेल्या ऑटोचालक व कारचालकाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने