आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेच व्यवस्थापन करायलाच हव...!

मला वेळ नाही अशी गोष्टच जगात अस्तित्वात नसते. आपल्याकडे वेळ असतोच. फक्त आपण प्राधान्यक्रम बदलावा लागतो. कोणत्या गोष्टीला कधी आणि किती वेळ द्यायचा, हे फक्त आपणच ठरवू शकतो. 


आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेच व्यवस्थापन करायलाच हव , शिवाय, आपल्याला काही अडचणी येत असतील, तर लोकांना आपले प्रॉब्लेम्स सांगत बसू नये. कारण, २० टक्के लोकांना त्यात काहीच रस नसतो आणि उरले ८c टक्के लोक तर आपले प्रॉब्लेम्स ऐकून मनातल्या मनात खूश होत असतात, समस्या येणारच आणि आपल्यालाच त्यातून मार्ग काढावा लागतो. 

त्यासाठी भूतकाळाचा सहज स्वीकार करायला हवा. जे घडून गेल, ते संपल आणि भविष्यकाळ आपली वाट पाहतो आहे. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. वर्तमानकाळाला आपल्या हाताशी घेऊन कोणत्याही भीतीशिवाय भविष्याला सामोरे जायला हवं. 

'चलता है. 'अशी मानसिकता आधी दूर करायला हवी, कारण, त्यामुळे हाताला आलेल्या गोष्टीही दूर जातात. प्रयत्नामध्ये खंड पडतो सुधारणा करण्याची इच्छाही संपून जाते. कारण मुळातच तशी मानसिकता असेल, तर त्याही परिस्थितीत आपण असच म्हणू की, 'चलता है.
थोडे नवीन जरा जुने