ताण - तणावात आहात? 'या' शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागेल !


आजच्या धावपळीच्या जीवनात जर तुम्ही कोणासोबत बोललं तर तो कोणत्या ना कोणत्या तणावात असल्याचं लक्षात येईल. घर असो वा ऑफिस सगळीकडे माणूस फक्त यंत्रासारखा काम करत आहे. किंबहुना हे देखील बघत नाही की त्याचे आरोग्य कमी कमी होत चालले आहे. 

जीवनात काम करण्याची एक सीमा आणि वेळ आहे परंतु जेव्हा आपण स्वतः ला कोणत्याही कामात गरजेपेक्षा जास्त जास्त व्यस्त करतो तेव्हा त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. चला तर मग बघुया तणाव आपल्याला कोणकोणत्या आजारात घेऊन जातो.

हृदय रोग
देशात ८०% हृदयविकाराच्या झटक्याचे कारण हे अधिक तणाव आणि चिंता याचे हृदयावरील परिणाम होय. आजच्या या युगात प्रत्येक जण स्वतः ला आणि आपल्या मुलांना सगळ्यात पुढे असेलेल पाहू इच्छितो. यामुळे आईवडील तणावात जगतात आणि आपल्या मुलांना देखील तणावात टाकतात. यामुळे आजची तरुणाई खूप साऱ्या आजारांच्या विळख्यात सापडली आहे.

त्वचा रोग
आपण पाहिले असेल की तणाव आणि चिंताग्रस्त लोकांचे चेहरे कोमेजलेले दिसतात. मोठी माणसं नेहमी सांगतात की तणाव चेहऱ्यावरील चमक कमी करते कारण चिंताग्रस्त माणूस सुखाची झोप घेऊ शकत नाही आणि यामुळे तेज कमी होते

केस गळणे आणि डोकं जड पडणे
पौष्टीक आहार घेऊन देखील जर तुमचे केस गळत असतील तर समजून जा की यामागे कमजोरी किंवा तणाव हीच कारण आहेत. डोकं जड पडण्यामागे देखील अधिक तणाव हेच कारण असू शकत.

झोप न येणं
माणसाचे तणावात राहणे हे सगळ्यात जास्त झोपेवर परिणाम करते. जर तुम्ही पूर्ण झोप घेत नाही तर त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर पडतो.

विस्मरण होणे
खूप जास्त वेळ तणावात असलेल्या लोकांची स्मरणशक्ती कमी होते. जुन्या नाही परंतु ते वर्तमान गोष्टी पण विसरून जातात.
थोडे नवीन जरा जुने