पेनकिलर गोळ्या नेहमी खाताय? मग सावधान !


आजकालच्या तरुणांमध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही. कारण जरा काही दुखायला लागलं की ही मंडळी लगेच पेनकिलरला पसंती देतात.

आजकालच्या तरुणांमध्ये सहनशक्ती अजिबात राहिलेली नाही. कारण जरा काही दुखायला लागलं की ही मंडळी लगेच पेनकिलरला पसंती देतात. त्यांना डॉक्टरांकडे जायचाही कंटाळा येतो. दुखण्यावर कुठलंही मलम लावण्यापेक्षा ते पेनकिलरलाच अधिक पसंती देतात. या पेनकिलरमुळे आपल्याला तत्काळ बरं वाटतं यामुळेच त्या गोळ्यांची सवय होते.

सवय याचा अर्थ असा की या गोळ्या आपण वारंवार घेतो. अशा रीतीने या पेनकिलरची हळूहळू सवय होते आणि आपण प्रत्येक वेळी या गोळ्या घेतो मात्र या गोळ्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. केवळ हृदयाचं आरोग्यच नव्हे तर ब्रेन स्ट्रोकचादेखील धोका यामुळे संभवतो. कारण या गोळ्यांमध्ये आयब्रूफेन आणि डाइक्लोफेनैकसारखी केमिकल्स असतात. ही केमिकल्स हृदयाची गती अनियमित करतात. यामुळे ऑट्रियल फिब्रिलेशनचा धोका वाढतो.

 या स्थितीत हृदयाचे ठोके इतके वाढतात की हार्ट अ‍ॅटॅकचा धोका अधिक असतो. या पेनकिलर शरीरात साइक्लोऑक्सिजन नामक इंझाइमला बाधित करतं. त्यामुळे रक्तदाब वाढतो जेणेकरून ठोक्यांची अनियमितता वाढते. म्हणूनच सातत्याने पेनकिलर घेतल्यामुळे हार्ट अ‍ॅटक येण्याचा धोका तीन टक्क्यांनी वाढतो. म्हणून शक्य असेल तितकं या गोळ्यांपासून लांबच राहा. तुमच्या दुखण्यापासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर तुम्ही योगधारणा, ध्यान, योग्य आहार आणि नियमित दिनचर्येचा अवलंब केला पाहिजे.
थोडे नवीन जरा जुने