जाणून घ्या! तरुण कसा असावा ?

तरुण कसा असावा? त्याचे चालणे, बोलणे इतकेच काय बसणे याच्यातून त्याच्या मनाचा विकास किती झाला आहे हे समजते. मन, मेंदू, मनगट, मान आणि मनका हे पाच म ज्याचे तजेलदार आहेत तो तरुण असतो. ज्याचे मन प्रफुल्लित असते. त्याच्या वयाच्या संख्येवरून न पाहता त्याच्या मनाचे वय महत्त्वाचे असते. 


ज्याचा मेंदू सक्रिय असतो तो सदा कार्यक्षम असतो, तो तरुण असतो. ज्याच्या मनगटात धमक असते, तो तरुण असतो. ज्याची मान ताठ असते, तो तरुण असतो. इतकेच काय ज्याचा मनका ताठ असतो तो तरुण असतो. अशा तरुणाच्या शिरावर व मनावर भार आहे, जीवनशक्तीचा विकास करण्याचा.

हिटलर एखाद्या प्रांतावर आक्रमण करायचा त्यावेळी तो तेथील माणसे कशी जगतात, तरुणासारखी ताठ की वृद्धासारखी वाकून, यावरून तो अंदाज करायचा. जे ताठ बसतात, चालतात ते बलवान असतात. वाकून चालणारे भित्रे असतात. व्यायाम, योगासने यांच्या माध्यमातून आपण मनाचा आणि शरीराचा विकास करू शकतो. 

त्यामुळे आपले शरीर सदैव कार्यक्षम राहते.प्राणायाम व योगासनाने शरीराबरोबर मनाचाही व्यायाम होतो. मन सक्रिय राहिल्यास त्याचा विकास होतो. परिणामी व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. मनाला प्रफुल्लित ठेवण्यासाठी त्याला सद्विचाराने सिंचन घातल्यास ते तरुण, तजेलदार राहील. आत्मप्रेम व आत्मविश्रांतीने जीवनशक्तीचा विकास होईल.
थोडे नवीन जरा जुने