आवडीचे काम काही काळ करायला मिळाले म्हणजे...

आपल्या कामावर प्रेम करत असाल तर अनेक वेळा पुढे जाण्यासाठी ते सोडावे लागू शकते. सोडण्याचे कारण काहीही असो, केवळ नाेटीस देऊन जाऊ नका. ज्यांच्यासमवेत बराच काळ व्यतीत केला त्यांना भेटून जा. ही बाब महत्त्वाची आहे. जे कर्मचारी सहकारी तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, त्यांच्यासमवेत निरोपाची पार्टीही करू शकता. 


तुम्ही कायमसाठी गुडबाय करत नाही हे लक्षात ठेवा. नातेसंबंध पुढे चालूच राहतील आणि नव्या मार्गावर पोहोचतील. पुढे जे मिळणार आहे त्याचा आनंद आहे. पण जे सुटणार आहे त्याबद्दल वाईट वाटणे साहजिक आहे. तुमच्या पसंतीचे काम काही काळ करायला मिळाले हीच बाब महत्त्वाची.
थोडे नवीन जरा जुने