लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहेत एसी, कुलर्स ?


नवजात अर्भकाला गरम, कोंदट आणि दमट वातावरणात ठेवण्यापेक्षा कुलर किंवा एअर कंडिशनर (एसी) वापरणे नक्कीच सुरक्षित आहे. मात्र, बाहेरील तापमान अधिक असेल, तर एसी/एअर कुलर्स वापरणे सुरक्षित आहे. तापमान ३४-३५ अंश सेल्सिअसहून अधिक असेल, तर बाळाला एसी/एअर कुलरशिवाय अस्वस्थ वाटू शकेल. एका विशिष्ट तापमान श्रेणीत बाळ अगदी आरामात राहू शकते आणि स्वत:च्या शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी त्याची किमान ऊर्जा वापरली जाते. एअर कंडिशनर किंवा कुलर वापरताना तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे.
खोली खूप थंड होऊ देऊ नका :खोली खूप थंड होणार नाही, याची काळजी आई-वडिलांनी घेतली पाहिजे. जर कुलर वापरत असाल, तर खिडक्या थोडय़ा उघडय़ा ठेवा, कारण कुलरमुळे वातावरणातील आद्र्रता वाढते आणि ते बाळाच्या शरीरासाठी योग्य नाही.

एसी किंवा कुलरमधून येणा-या थंड हवेच्या झोतापासून बाळाला दूर ठेवा. हात-पाय संपूर्ण झाकले जातील, अशा पद्धतीने पातळ आवरणांचे कपडे बाळाला घालणे अत्यावश्यक आहे. यामुळे बाळाचे थंड हवेपासून संरक्षण होईल.

एसी किंवा कुलरचे सव्‍‌र्हिसिंग नियमित करून घ्या :नियमित सव्‍‌र्हिसिंगमुळे या यंत्रांची कार्यक्षमता सुधारते. एसींचा मेंटेनन्स नियमित केला नाही, तर त्यातून जीवाणूंचा प्रादुर्भाव पसरू शकतो असेही निदर्शनास आले आहे.

बाळाच्या त्वचेतील ओलावा कायम ठेवा :एसीचा बराच वापर केल्यामुळे बाळाची त्वचा शुष्क होऊ शकते. त्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. गरम हवा साधारणपणे वर जाते आणि खालील पृष्ठभाग थंड राहतो, त्यामुळे तुम्ही जमिनीवर एखादी पातळ गादी घालू त्यावर बाळाला ठेवू शकता. खोलीतून बाहेर पडल्यानंतर बाळाला लगेचच उष्ण जागी नेऊ नका. तापमानात अचानक होणारा बदल तुमच्या बाळाच्या शरीराला सहन होणार नाही. त्याऐवजी एसी बंद करा आणि बाळाला बाहेरच्या तापमानाची सवय होऊ द्या. एअर कंडिशनर सुरू करण्यापूर्वी खिडक्या उघडून खोलीतील हवा बाहेर जाऊ द्या.

प्रिमॅच्युअर बाळांची विशेष काळजीमुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांची उष्णता नियमन क्षमता कमी असते. त्यामुळे बाळ मुदतपूर्व जन्मलेले असेल, तर खोलीतील तापमान २६ अंश सेल्सिअसहून अधिक राहील, याची काळजी घ्या.

बाळाच्या शरीराचे तापमान व बाहेरील तापमानावर सतत लक्ष ठेवून त्याप्रमाणे एसीचे तापमान राखणे गरजेचे आहे.

बाळाचे शरीर व त्याचे डोके तपासा. त्याची पावले, डोके, छातीच्या तुलनेत गार असतील, तर बाळ कोल्ड स्ट्रेसखाली आहे, म्हणजेच त्याला हायपोथर्मियाचा धोका आहे, असा याचा अर्थ होतो. मात्र, छाती आणि शरीराची टोके दोन्हीही थंड झाली आहेत, याचा अर्थ त्याला कदाचित हायपोथर्मिया झाला आहे आणि रिवॉर्मिगची गरज आहे. बाळाला चांगले गुंडाळून ठेवणे आवश्यक आहे.
थोडे नवीन जरा जुने