गर्भावस्थेत फिश ऑइलचे सेवन करणे गर्भातील बाळासाठी अत्यंत फायदेशीर असते...


गर्भावस्थेत फिश ऑइलचे सेवन करणे गर्भातील बाळासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते,असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात आढळले आहे. 

तज्ज्ञांच्या मते,ज्या गरोदर महिला ओमेगा-3 सप्लिमेंट्सचे सेवन करतात त्यांच्या गर्भातील बाळाची प्रतिकारशक्ती बळकट होते. 

यामुळे बाळ एक्झिमाने पीडित होण्याची शक्यताही कमी होते. अ‍ॅडलेड विद्यापीठाच्या संशोधकांनी सुमारे 706 गरोदर महिलांच्या कुटुंबात कुणाला त्वचेशी संबंधित अ‍ॅलर्जी आहे किंवा नाही याचे संशोधन केले.

त्यातील अर्ध्या गरोदर महिलांना गर्भधारणेच्या 21 आठवड्यांनंतर डिलिव्हरीपर्यंत फिश ऑइल सप्लिमेंट्स दिवसातून तीन वेळा घेण्याचा सल्ला देण्यात आला. उर्वरित गरोदर महिलांना वनस्पती तेलाचा डोस देण्यात आला. 

डिलिव्हरीनंतर या संशोधनाद्वारे होणा-या परिणामांच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा फिश आॅइल सप्लिमेंट्स घेणाºया महिलांच्या बाळांना एक्झिमाची समस्या नव्हती असे दिसून आले.
थोडे नवीन जरा जुने