पापामुळे जन्म मृत्यू चक्रामधे अडकलेल्या जीवाला बाहेर काढण्यासाठी तुकाराममहाराज मार्ग सांगताततुकाराम महाराज म्हणताहेत की सध्याच्या ह्या कलीयुगामधे माणसाला भगवंताची प्राप्ती होण्यासाठी साधा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जरी ईतर अनेक मार्ग आहेत तरी त्या मार्गांचे आचरण करण्याची क्षमताच माणसात उरलेली नाही य़ोग्य ते विधिविधान करणे जवळजवळ अशक्यच झाले आहे.

अवघ्या वाटा जाल्या क्षीण । कळीं न घडे साधन ॥ १ ॥
उचित विधिविधान । न कळें न घडे सर्वथा ॥ २ ॥
भक्तिपंथ बहु सोपा । पुण्य नागवे वा पापा ॥ ३॥
येणें जाणें खेपा । येणेंचि खंडती ॥ ४॥
उभारोनि बाहे । विठो पालवित आहे ॥ ५॥
दांसा मीच साहे । मुखे बोले आपुल्या ॥ ६॥
भाविक विस्वासी । पार उतरिलें त्यासीं ॥ ७॥
तुका म्हणें नासी । कुतर्क्याचें कपाळीं ॥ ८ ॥

आपल्यापैकी अनेकांचा हा अनुभव आहे की साधी सत्यनारायणाची पूजासुद्धा साग्रसंगीत कशी करायची याचे आपल्याजवळ ज्ञान नाहि. विधीविधानच माहित नसण्याचा ह्यावरून अर्थ काढता येईल. असो.
तरीही निराश होण्याचे कारण नाही.

आपण सर्व हे जाणतोच आहोत की पापामुळे फळे भोगण्यासाठी जन्ममृत्यूचक्रामधे जीव गुंततो व अनेक जन्मासाठी यातना भोगत राहतो. पुण्यजरी केले तरी स्वर्गामधे सुखे भोगण्यासाठी जातो. पुण्यक्षय झाला की पुन: जन्म घेतो व जन्म मृत्यूचक्रामधे अडकतो. दोन्ही हानीकारकच आहेत. पण भक्तीमुळे माणसाचे पाप जसे नष्ट होत तसेच पुण्याचाही क्षय होतो व म्हणुनच माणसाल मोक्ष मिळतो.

तुकाराम महाराज म्हणताहेत की भगवंता निरनिराळ्या खुणांद्वारे भक्ताने आपल्याकडे लक्ष द्यावे हेच सुचवित असतो. पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही.
थोडे नवीन जरा जुने