सकाळी सकाळी पोट साफ होत नाही? या पाच गोष्टी चुकून खाऊ नका ! खासकरून पोटाची काळजी घेणे गरजेचे असते. सकाळी सकाळी जर पोट साफ झाले नाहीतर दिवसभर अस्वस्थ वाटते. सर्व आजारांची सुरुवात ही पोटापासून होते असे म्हटले जाते. पोट ठीक नसल्यास दुसरे आजार होत असतात.

आज आम्ही अशा पाच गोष्टी सांगणार आहोत की, जेव्हा पोट खराब असेल तर या पाच गोष्टी चुकून खाऊ नये. 

१) दुधापासून बनवलेले पदार्थ - 

दुधांपासून बनवलेले पदार्थाचा जेवणात समावेश असतो. दुधाचे पदार्थ आवर्जून जेवणात वापरले जातात. मात्र दुधांचे पदार्थ पचण्यासाठी खूप वेळ जातो. दुधांच्या पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते आणि फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे दुधांपासून बनवलेल्या पदार्थांमुळे जेवण पचत नाही

२) चिप्स -

 चिप्स खाणं देखील अपचनासाठी आमंत्रण आहे. बटाट्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अन्य खाणं पचण्याच्या तुलनेत बटाटा पचण्यास अधिक वेळ लागतो. त्यासाठी चिप्स आणि तळलेले पदार्थ खाऊ नये

३) फ्रोजन केलेले पदार्थ खाण्यापासून टाळावे. काही दिवसापासून ठेवलेले पदार्थ तुमच्या पोटात गडबड करू शकतात. त्यामुळे दररोज ताज्या भाज्या आणि फळे खावी.

४) बिस्किट - 

बिस्किट आणि कुकीज मैद्याचे प्रमाण जास्त असते. मैदा पोटासाठी खूप हानिकारक असतो. त्यामुळे बिस्किट आणि कुकीज खाणं टाळावं.

५) केळं - 

केळं खरंतर खाणं पचवण्यास मदत करते. मात्र जर का केळं कच्च असल्यास त्याचा उलट परिणाम पोटावर होऊ शकतो. त्यामुळे चुकून पण कच्च केळं खाऊ नये.
थोडे नवीन जरा जुने