अतिरिक्त चरबी वाढवण्यास हेही एक कारण असू शकते !


अतिरिक्त खाणे, फास्टफूड आणि ऑइली फूड खाणे, व्यायाम न करणे या गोष्टी आपण जाडी वाढण्यासाठी कारणीभूत असतात असं बोलतो. मात्र एका संशोधनातून असं स्पष्ट झालंय की कमी झोप हे देखील जाडी वाढण्यासाठी एक कारण आहे.

अमेरिकेतल्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात असं स्पष्ट झालंय की पुरेशी झोप न मिळणे हे जाडी वाढण्याचं एक कारण आहे. लोकांना झोप कमी मिळते. ती पूर्ण होण्याच्या आतच कामाच्या निमित्ताने उठावे लागते. पण अर्धवट झोपेमुळे आलेला आळस घालविण्यासाठी चहा किंवा मोठा कप भरून कॉफी घेतली की, आळसावलेले शरीर कामाला लागते. मात्र अशा प्रकारची उत्तेजक पेये घेणे आणि झोप न झालेल्या शरीराला तसेच कामाला लावणे यातूनही जाडी वाढते.

खाण्यावर कंट्रोल नसला की वजन वाढायला मदत तसं पाहिलं तर वजन वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिरिक्त खाणे. खाण्यावर आपला कंट्रोल नसला की वजन वाढायला मदत होते. मात्र झोप आणि खाण्याचा खूप जवळचा संबंध आहे. झोपेच्या वेळा आणि झोपेचा पॅटर्न बदलला की, मेंदूमध्ये होणार्‍या प्रक्रिया विचलित होतात आणि परिणामी माणसाला अधिक उष्मांक पुरवणारे अन्न खाण्याची वासना होते आणि त्यामुळे जाडी वाढते.

नियमितपणा कमी झाल्याने शरीरात चरबीपुरेशी झोप घेतली नसेल तर शरीरामध्ये घेरलीन नावाचे हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया हीसुद्धा विस्कळीत होते. या हार्मोनमुळे भूक लागत असते. परंतु त्याचे पाझरणे विस्कळीत झाल्यामुळे जेवणाचा पॅटर्नही विस्कळीत होतो आणि जेवणातला नियमितपणा कमी झाल्याने शरीरात चरबी जमा व्हायला लागते.


मधुमेहासारखे विकार सुद्धा बळावू शकतात
अनियमित आणि अपुर्‍या झोपेचे इतरही अनेक परिणाम शरीरावर होतात. याबाबत काही तज्ज्ञांनी तर फार गांभीर्याने इशारे दिले आहेत. शरीराच्या कष्टाबरोबरच झोपेची आवश्यकता असते, पण तिच्यात नियमितता नसेल तर शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये हॅवॉक निर्माण होतो. त्यातून मधुमेहासारखे विकार सुद्धा बळावू शकतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भूक, पचनक्रिया, रक्ताभिसरण आणि मन:स्थिती या सर्वांचेच अनियमित झोपेने खूप नुकसान होत असते.
थोडे नवीन जरा जुने