फ्रान्सचे अर्थतज्ज्ञ म्हणाले, मोदींचं आर्थिक धोरण थांबलं, गुंतवणूकदारही भारतापासून दूर जाणार....


नवी दिल्ली : फ्रान्सचे अर्थतज्ज्ञ गॉय सोरमैन यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली असून आर्थिक सुधारणा मध्येच थांबल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार आता भारतापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मत सोरमैन यांनी व्यक्त केले आहे.

भारत सरकारने नवीन उद्योजकांच्या समर्थनासाठी अनेक अशी पावले टाकली खरी, पण राजकीय प्रकरणांबाबत लक्ष केंद्रित करण्यामुळे त्यांचे सुधारणांचे सत्र थांबले गेले. यामुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम पडू लागले आहेत, असे सोरमैन यांना वाटते. भारतातील व परदेशातील गुंतवणूकदार घाबरलेले आहेत. त्यामुळे ते भारतात गुंतवणूक करण्यापासून मागे हटत आहेत. 

सध्याच्या काळात भारतावर आर्थिक संरक्षणवादाचा व्यापक परिणाम झाला आहे. मोदी यांनी सुरुवातीला भारतात नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिले व एका राष्ट्रीय बाजाराची निर्मिती केली. परवाना राजवटीला संपुष्टात आणले व भ्रष्टाचारावरही प्रहार केला तसेच मेक इन इंडियाला प्रोत्साहन दिले आहे. 

इतके करूनही मोदी यांच्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम मध्येच थांबला व ते आर्थिक मुद्दे विसरून राजकीय प्रकरणांमध्ये लक्ष केंद्रित करू लागले. यामुळे भारत व भारत सरकारच्या प्रतिमेवरही दुष्परिणाम झाल्याचे मत सोरमैन यांनी व्यक्त केले आहे.आपण जागतिक आर्थिक मंदीमुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांकडे सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो.
थोडे नवीन जरा जुने