गर्भवती महिलांनी कारल्याचे सेवन केल्यास काय होईल ?


गर्भावस्थेत स्त्रिया आपल्या खाण्यापिण्याबद्दल फारच कॉन्शियस होऊन जातात. काय खायला पाहिजे काय नाही, याबद्दल बऱ्याच गर्भवती स्त्रियांना योग्य माहिती नसते. बऱ्याच महिला गर्भावस्थेत कारले खायला पाहिजे की नाही याबद्दल भ्रमित असतात, तर त्यांचे कन्फ्युजन आपण दूर करू. 

गर्भावस्थेदरम्यान कारल्याचे सेवन आई आणि बाळ दोघांच्या आरोग्यासाठी एक उत्तम विकल्प सिद्ध होऊ शकतो. कारल्यात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, बीटा-केरोटिन आणि आयट्री फायबर असते, जे गर्भात वाढणारे बाळ आणि आई दोघांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

बॉवेल मुव्हमेंटला योग्य ठेवतो कारले पेरिस्टालिसिसला बूस्ट देण्यासदेखील मदत करते, जे नंतर बॉवेल हालचालीला नियंत्रित करणे आणि गर्भवती महिलांच्या पचन तंत्राला योग्य करण्यात मदत करते. कारले पचन तंत्राशी निगडित इतर समस्यांमध्येदेखील आराम देण्यास मदत करतो.

फोलेट उच्च प्रमाणात असते  - 

गर्भवती महिलांसाठी फोलेटची आवश्यकता असते. हे मिनरल्स संभावित न्यूरल ट्यूब डिफेक्टला सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. कारल्यात फोलेटची मात्रा फार जास्त असते. यामुळे गर्भवती महिलांमध्ये या मिनरल्सच्या दैनिक आवश्यकतेचे एकचतुर्थांश भाग आहे.

अँटिऑक्सिडंट असते - 

कारल्यात व्हिटॅमिन सी असते, जे अँटिऑक्सिडंट असून गर्भवती महिलांना हानिकारक बॅक्टेरियापासून लढण्याची शक्ती देते. हे गर्भवती महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारक सिस्टिमला बूस्ट करते.

फायबरचे प्रमाण जास्त - 

असतात कारल्यात फायबर उच्च मात्रेत असते, ज्यामुळे भूक लवकर लागत नाही. हे हाय कॅलरी फूड्स आणि जंक फूड्सच्या क्रेविंग्सला कमी करते. त्याशिवाय हे प्रेग्नन्सीदरम्यान लठ्ठ होण्यापासूनदेखील तुमचा बचाव करते.


अर्भकाचा विकास करते - 

कारल्यात काही खास प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा एक मोठा स्रोत असतो. यात आयर्न, नियासिन, पोटॅशियम, पेंटोथेनिक अॅसिड, जिंक, पाइरोडॉक्सिन, मॅग्नेशियम आणि मँगनीज सामील आहे. याला म्हणून आपण सुपर भाजी म्हणू शकतो कारण हे भ्रूणाच्या विकासात एक महत्त्वाची भूमिका बजावतो.
थोडे नवीन जरा जुने