नेहमी नव-नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करा !'या जगातलं सगळं ज्ञान मला आहे' मला सगळं माहिती आहे किंवा मला सगळंच जमतं. मला सगळे सगळं येतं. या गैरसमजाचं भलं मोठं गाठोडे अनेकांच्या डोक्यावर असते. 


साहजिकच, त्याच गाठोड्याचं ओझं इतकं असतं, की नवीन काही पाहावत नाही, नवीन काही सुचत नाही आणि मिळतही नाही. आपल्याला आहे त्या आयुष्यात काही बदल घडवायचा असेल, तर आधी ते गाठोडं दूर केलं पाहिजे. जर काही नवीन शिकायची इच्छा असेल, तर पहिल्यांदा ते 'मला सगळं कळतं .. ',हे ओझे उतरवायला हवे. त्याऐवजी मला काहीही माहिती नाही. किंवा मला काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे. अशी एक रिकामी टोपली डोक्यावर घ्यावी. जेणेकरून त्यात काहीतरी नवीन विचार नवी मांडणी घालता येईल. 

जर आपल्याला अस मनापासून वाटत असेल की, काही गोष्टी आपल्यासाठी बदलल्या जाव्यात, आपल्या आयुष्यात, आपल्या वॅकपॅलन्समध्ये काही चांगले बद्ल व्हावेत, लोकांनी आपल्याबद्दलच मत बदलाव- चांगलं बोलावं, तर एक गोष्ट आवर्जून केली पाहिजे ती म्हणजे, आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे यातील ‘बदल' हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे.
थोडे नवीन जरा जुने