दररोज मेडिटेशन केल्याने होतात 'हे' चार फायदे !ध्याणधारणा केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते, परंतु धावपळीच्या वातावरणात ज्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते तीदेखील मिळते आणि ती गोष्ट म्हणजे स्थैर्य
कधी-कधी ध्यानधारणा करताना त्रास होतो, पण नंतर हळूहळू सवय होते.


दररोज मेडिटेशन केल्याने कोणते चार फायदे होतात -

उत्तम एकाग्रता : 

धावपळ आणि तणावाच्या कारणामुळे सर्वात पहिल्यांदा जी गोष्ट हरवते ती म्हणजे एकाग्रता. एकाग्रतेच्या कमतरतेमुळे कोणतेही काम करण्यात अडचण येते. अशा वेळी दररोज मेडिटेशन केल्यास एकाग्रता वाढते.


संयमात होते वाढ : 

दररोजच्या जीवनात आपण अनेक वेळा संयम लवकर सुटतो. ध्यानधारणेमुळे व्यक्तीला संयम वाढवण्याची संधी मिळते. ध्यानधारणा करणारा व्यक्ती कधीच लहान लहान गोष्टीवर आपला संयम सोडत नाही. तर अनेक वेळा त्याच्याकडे अशा गोष्टींवर समाधान असते.


सुदृढ आरोग्य : 

अनेक संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की ध्यान केल्याने आरोग्यात सुधारणा होते. दररोज ध्यानधारणेमुळे तणावाची पातळी कमी होते आणि अस्वस्थतेवर नियंत्रण राहते. परिणामी, मानसिकता आणि शारीरिक आरोग्य कायम राहते.

स्वत:ला ओळखण्याची संधी : 

अनेक वेळा व्यग्र दिवसामुळे अनेक प्रश्न मनातल्या मनात दाबून राहतात. ध्यानधारणेमुळे स्वत:ला जाणून घेण्यास वेळ मिळतो. आपण जे काही करत आहोत ते योग्य आहे की नाही याचेदेखील आत्मचिंतन करता येते. 
थोडे नवीन जरा जुने