"ह्या" भाज्यांच्या आहारात समावेश केल्याने शरीर होईल ताकदवान !


अनियमित खानपान आणि दिनचर्या, जास्त प्रमाणात फास्ट फूडचे सेवन इत्यादी कारणांमुळे विकसित समाजातील आपल्यासारख्या लोकांचे आयुष्यमान 60 ते 65 वर्षांचे झाले आहे तर आदिवासी लोकांचे आयुष्यमान 80 ते 85 वर्षांचे आहे. तर मग, विकसित आणि स्वस्थ कोण? आपण का ते लोक, जे आजही आदिवासी म्हणून ओळखले जातात. 

जास्त विकसित आणि पैसा कमावण्याच्या शर्यतीमध्ये आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांपासून दूर घेऊन जात आहोत. आहाराच्या नावावर कृत्रिम रंगाने रंगवलेल्या भाज्या आणि फास्ट फूड कल्चर आपल्या आरोग्याला नष्ट करत आहे. 

जर तुम्ही आदिवासी लोकांसारखे स्वस्थ राहण्यास इच्छुक असाल तर येथे जाणून घ्या, काही अशा भाज्यांबद्दल ज्या तुम्हाला नेहमी स्वस्थ आणि निरोगी ठेवतील.

तोंडले -

ही भारतात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांची भाजी करतात. फळे सुरुवातीला हिरवी असतात, पिकल्या नंतर ती लाल दिसतात. तोंडल्यामध्ये कॅरोटीन व्यतिरिक्त प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमसारखे महत्त्वपूर्ण तत्व आढळून येतात. गुजरात येथील डॉँग आदिवासी भागात तोंडल्याची भाजी खूप प्रचलित आहे. येथील आदिवासी लोकांच्या मतानुसार अर्धेकच्चे तोंडले काही दिवस खाल्ल्यास डोळ्यांना लागलेला चष्मा काढून ठेवाल. तोंडले काविळीवर, कुष्ठरोगावर व पांडुरोगावर गुणकारी आहेत.

मध्यप्रदेशमधील पाताळकोट येथील आदिवासी शेवग्याच्या झाडाच्या पानांची चटणी करून खातात. शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये व्हिटॅमिन 'ए' भरपूर प्रमाणात असते. शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट अधिक कॅल्शिअम आणि दोन पट अधिक प्रथिनं हे पोषकद्रव्य असतात.

पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताज रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळेल.

शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. शेवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये केला जाऊ शकतो. यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो.


बीटमध्ये आढळणारा अ‍ँटीऑक्सिडेंट हा पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. हा एक नैसर्गिक शर्करा मिळण्याचा स्रोत आहे. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्वे असतात. बीटमध्ये किडनी आणि पित्ताशय स्वच्छ ठेवण्याची शक्ती असते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास किंवा अर्धा ग्लास बीट ज्युस अवश्य घ्या. किडनी आणि पित्ताशय विकारांमध्ये बीट ज्युस आणि गाजर ज्युस एकत्रित करून पिणे आरोग्यदायी असते. पांढरे बीट पाण्यात उकडवून हे पाणी फोड, जळजळ आणि तोंड येणे यासाठी उपयुक्त आहे. ताप आणि थंडीतही उपयुक्त आहे. म्हणून सदैव तारुण्य टिकवायचे असल्यास बीटचे नियमित सेवन करा.


दोडक्याची चटणी तयार करून आदिवासी लोक ज्वर (ज्वर) आलेल्या व्यक्तीला खाऊ घालतात. या लोकांच्या मतानुसार यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कावीळ झालेल्या व्यक्तीच्या नाकामध्ये दोडक्याचा २-३ थेंब रस टाकल्यास नाकातून पिवळा द्रव पदार्थ बाहेर पडतो. या उपायाने कावीळ लवकर समाप्त होतो असे आदिवासी लोक मानतात. दोडक्यामध्ये इन्सुलिनप्रमाणे पेप्टाईड्स आढळून येतात, यामुळे मधुमेहावर (डायबिटीस) नियंत्रण ठेवण्याचा हा उत्तम उपाय आहे.


आदिवासी लोकांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात असतात. आदिवासी लोक शरीरात ताकद आणि चपळता निर्माण होण्यासाठी पालक भरपूर प्रमाणात खातात. पालकाच्या भाजीत जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन व लोह असते. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालकमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन निर्माण करणारे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असते. कच्चा पालक फार गुणकारी आहे. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुरळीत काम करते. खोकला आणि फुफ्फुसावर आलेली सूज कमी करण्यासाठी पालकच्या रसाने गुळण्या कराव्यात. पालकच्या रसाने दृष्टीदोष कमी होतो. तसेच स्मरणशक्तीही वाढते.


दररोज जेवणामध्ये टोमॅटोचा वापर अवश्य करा. टोमॅटोमध्ये लायकोपेन हे ऍन्टीऑग्झिटंट असल्यामुळे ते शरीराची झीज रोखते आणि तारुण्याचे रक्षण करते. म्हणून नियमित टोमॅटो खाणार्‍यांची त्वचा आणि केस तजेलदार असतात. मधुमेहाच्या रुग्णामध्ये ब्लड शुगरचे प्रमाण समतोल राखण्यासाठी टोमॅटो खाणे उपयुक्त ठरू शकते. आजारानंतर आलेला थकवा दूर करण्यासाठी टोमॅटो सर्वात चांगला विकल्प आहे.


आदिवासी लोक लहान मुलांसाठी पत्ता कोबीचे सेवन गुणकारी मानतात. ८ ते १० महिने वय असणार्या मुलांचे वजन कमी असल्यास त्यांना अर्धा ते एक कप पत्ता कोबीचा रस प्यायला दिल्यास वजन वाढते. कोबीची पाने गोड, शीतल, मूत्रल व कृमिनाशक आहेत. पोटदुखी, त्वचाविकार, दमा व ताप यांवर कोबीची पानं गुणकारी आहेत, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. हिरड्यांच्या रोगावर कच्ची पाने चघळणे उपयुक्त ठरते.
थोडे नवीन जरा जुने