फेशियलचे 'हे' आरोग्यदायक फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!


फेशियल प्रक्रियेत चेहर्‍याच्या त्वचेवरील मृत पेशी काढून चेहरा स्वच्छ केला जातो. त्यासोबत त्वचेला नरिशमेंट केले जाते. फेशियलवेळी केल्या जाणार्‍या मसाजमुळे फक्त रक्तसंचार वाढून चेहर्‍याचे तेज वाढत नाही, तर मोठय़ा प्रमाणात आराम देखील मिळतो.
त्वचा होते तजेलदार.


त्वचेवर मृत पेशींचा एक थर जमा झालेला असतो, परंतु हे सहजासहजी दिसत नाही. फेशियल मसाजवेळी त्वचेला एक्सफॉलिएट देखील केले जाते. यामुळे मृत पेशींचा थर निघून जातो आणि त्वचा तजेलदार दिसू लागते. मृत पेशींचा थर पुन्हा 15 ते 30 दिवसांत पुन्हा जमा होतो. म्हणून महिन्यात एकदा तरी फेशियल करण्याचा सल्ला दिला जातो.


पेशी होतात कार्यरत

मसाजमुळे रक्तसंचार वाढल्याने चेहर्‍यावरील पेशी सक्रिय होतात. ज्यामुळे चेहरा तजेलदार दिसू लागतो.


रिलॅक्सेशन पॉइंटवर लक्ष

फेशियल मसाज करताना चेहर्‍याच्या स्वच्छतेसोबत रिलॅक्सेशन पॉइंटवर देखील खास लक्ष दिले जाते. या पॉइंटवर हलकासा दबाव दिल्याने आराम मिळतो आणि प्रफुल्लित वाटू लागते.
थोडे नवीन जरा जुने