या कारणांमुळे भगवंताच्या भक्तीत अडथळे येतात


या कारणांमुळे भगवंताच्या भक्तीत अडथळे येतात
१) आपल्या जवळच्या आप्त, मित्राबद्दल काळजी वाटणे.
२) पैसा पुरे पडेल कां? हा विचार सतावणे.
३) मोठ्या आजारपणांची, म्हातारपणाची काळजी वाटणे.
४) जे विषय आवडीचे आहेत पण ज्यांच्या मागे लागल्याने फक्त वेळेचा नास होतो हेव कळले तरी त्यांच्या मागे मनाचे धावणे.
५) लोकांनी आपल्या सांगण्यालाच मान देऊन आपलेच म्हणणे ऐकावे असे वाटणे. व जर कोणी आपल्या सांगाण्याविषयी कांही खुलासा करत असेल तर ते आपल्याला विरोध करत आहेत , मान देत नाहीत असे वाटणे.
६) झोपेच्या बाबतीत जागरूक असणे पण भगवंताचे नामस्मरण पूजाकरणे , आपले प्रत्येक कार्य ही भगवंताची पूजा करतो आहे ही भावना ठेवण्या विषयी साठी मात्र तसे जागरूक नसणे.
७) संत पुरुषांचे वांङ्मय सोडून ईतर पुस्तके करमणूकीसाठी वाचणे व वेळ वाय घालवणे. .
८) वेळेचे नियोजन न करणे व अमूल्यवेळ वाया घालवणॆ.
९) स्वत:च्या रागावर नियंत्रण न ठेवणे व कडू बोलणे.
१०) घेतलेली वस्तू वेळीच तिच्या ठरविलेल्या जागी न ठेवणे.
११) अन्नाच्या बाबतीत फार चोखंदळ असणे.
१२) नीटनेटके न राहाणे. व्यायाम न करता फक्त औषधांवर अवलंबून असणे.
थोडे नवीन जरा जुने