थायरॉइडच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी,जीवनशैलीत करा हे बदल...


गळ्यात थायरॉइडच्या ग्रंथी असतात. हार्मोन सक्रिय करून मेटाबॉलिझम कार्यप्रवण ठेवणे हे त्यांचे मुख्य काम आहे. हा हार्मोन गरजेपेक्षा कमी वा अधिक सक्रिय झाल्यानंतर थायरॉइडशी निगडित समस्या उद्भवतात. 

यामुळेच वजन वाढणे व अनिद्रेसारख्या समस्यांना चालना मिळते. तज्ज्ञांच्या मते, भोजनप्रणालीत बदल करून या समस्येतून सुटका होऊ शकते. ती घरगुती पातळीवरही नियंत्रित केली जाऊ शकते. 

जे लोक हायपोथायरॉइडिझमने पीडित असतात त्यांनी धूम्रपान व मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहायला हवे. 

पीडित व्यक्तीने नेहमी संतुलित आहार घ्यावा आणि आहारात जीवनसत्त्व अ, ब व ई भरपूर असावे.
ब्रोक्कली (एक प्रकारची कोबी), पालक, मुगाच्या शेंगा व सोयाबीनचे सेवन केल्यास थायरॉइड ग्रंथीवर प्रतिकूल परिणाम होतो. 

तज्ज्ञांच्या मते, जे लोक थायरॉइडशी निगडित व्याधींनी पीडित आहेत त्यांनी विशेषत: उपरोक्त खाद्यपदार्थांपासून दूर राहायला हवे. 

थायरॉइड ग्रंथींची कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी जीवनसत्त्व ड अत्यावश्यक आहे. अंडी व दूध त्याचा चांगला स्रोत आहे. त्यासोबत उन्हाच्या संपर्कात येणेही अत्यावश्यक आहे. कारण त्यामुळे जीवनसत्त्व ड नैसर्गिकरीत्या मिळते. 

हायपरथायरॉइडिझम अर्थात ज्यांच्या शरीरात थाइरॉइड हार्मोन अधिक बनते त्यांची हाडे व स्नायू दुर्बल होऊ लागतात. अशा वेळी त्यांना आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवायला हवे. 

तज्ज्ञांच्या मते, पीडित व्यक्तीने दररोज 1 हजार मिलिग्रॅम कॅल्शियमचा आहारात समावेश करायला हवा. चीज, दही, ताक व पनीर अशा सर्व दुग्धजन्य पदार्थांत कॅल्शियम असते. 

अन्न शिजवण्यासाठी नेहमी आयोडिनयुक्त मिठाचाच वापर करा. कारण त्याच्या कमतरतेमुळेच या समस्या उद्भवतात.
थोडे नवीन जरा जुने