दम्याचा त्रास होत असेल तर ह्या टिप्स ठरतील फायदेशीर...


वातावरणात असलेले इरिटेट करणारे घटक कफ वा पडशासारख्या समस्येस कारणीभूत असतात. तसेच दम्याने पीडित असलेल्या व्यक्तीसाठीही ही स्थिती हानिकारक असू शकते. दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढवणा-या अशाच काही कारणांविषयी जाणून घेऊया. 

आतषबाजी : 

अ‍ॅनाल्स ऑफ अ‍ॅलर्जी, अस्थमा अँड इम्युनॉलॉजीनुसार, आतषबाजीचे वातावरण दम्याने पीडित असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक असते. अशा स्थितीत पीडितास श्वासोच्छ्वास घेण्यास खूप त्रास होतो, श्वास गुदमरतो आणि जीव घाबरल्यासारखा होतो. तज्ज्ञांच्या मते, फटाके फोडल्यानंतर सल्फर डायऑक्साइडसारखे घातक रसायने वातावरणात पसरतात. ते दमापीडितांसाठी खूप हानिकारक असते. 

गव्हाचे पीठ : 

स्वयंपाक करताना गव्हाचे पीठ जपून काढा किंवा ठेवा, कारण यामुळे दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. जेव्हा त्याची डस्ट श्वासोच्छ्वास घेताना नाकात पोहोचते तेव्हा फुप्फुसांच्या कार्यप्रणालीत अडथळा येतो. अशावेळी पीडिताचा त्रास वाढतो. 

गॅस अप्लायन्स : 

त्यातून निघणा-या नायट्रोजन डायऑक्साइडमुळेही दम्याच्या रुग्णाचा त्रास वाढू शकतो. 2008 मध्ये दम्याने पीडित असलेल्या जवळपास 150 मुलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून असे लक्षात आले की, घरात राहिल्यामुळे त्यांना कफ व छातीत आकस अशा समस्यांचा सामना करावा लागतो. गॅस स्टोव्ह व हिटरचा वापर केल्यामुळेही नायट्रोजन डायऑक्साइड उत्सर्जित होते. त्यामुळे व्हेंटिलेयशनची योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे. 

मेणबत्ती : 

पॅराफिन-बेस्ड मेणबत्ती पेटवल्यानंतर जी रसायने वातावरणात मिसळतात, ती दम्याच्या रुग्णांसाठी हानिकारक असतात. साउथ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात त्यास दुजोरा मिळाला आहे. अशा प्रकारच्या मेणबत्त्या विशिष्ट प्रसंगीच वापरल्या जातात. तज्ज्ञांच्या मते, त्याऐवजी मधमाशांच्या पोळातून निघणारे मेण आणि सोयाबीनपासून तयार केलेल्या मेणबत्तीचा वापर करायला हवा. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. 

प्रिंटर/फोटो कॉपी मशीन : 

लेसर प्रिंटर्स व फोटो कॉपी मशीनमधून उत्सर्जित होणारे अल्ट्राफाइन पार्टिकल्सही श्वसन प्रक्रियेत हानिकारक असतात. तज्ज्ञांच्या मते, दम्याच्या रुग्णांनी कार्यालयात काम करताना त्यांच्या आसपास प्रिंटर वा फोटो कॉपी मशीन ठेवलेली नसेल, याची काळजी घ्यावी.
थोडे नवीन जरा जुने