जखमा लवकर भरण्यासाठी हे नक्की करून पहा !

भाजणे, कापणे, जखमा होणे हे नित्याचेच असते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अशा घटना घड़तातच , उपचार केल्यावर जखमा काही दिवसांमध्ये बऱ्या होतात पण डाग राहतात. 


शिवाय जखमा बऱ्याच खोल असतील तर बऱ्या होण्यास वेळही लागतो. यावेळी वेदनांची तीव्रताही जास्त असते. म्हणूनच या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी तसेच डाग पडू नये या दृष्टीने काही उपाय योजणे गरजेचे आहे.

मधात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटी ऑक्सिडंट्स आणि अमीनो ऍसिडची चांगली मात्रा असते. जखम बरी करण्यास ती कारक ठरते. 

मधातील औषधी घटक जखम चिघळविणाऱ्या बॅक्टेरियांवर नियंत्रण ठेवतात. तसेच मधामुळे जखमेचे व्रण राहण्याचा धोकाही नाहिसा होतो. म्हणूनच भाजल्याची अथवा कापल्याची जखम लवकर बरी करण्यासाठी मधाचा वापर करावा. 

या कामी लवेंडर ऑईलदेखील गुणकारी सिद्ध होते. या तेलाने जखम लवकर भरून येतेच शिवाय वेदनाही कमी होतात. मात्र कोणतेही अन्य तेल एकत्र न करता केवळ लवेंडर ऑईल त्वचेवर अथवा जखमेवर लावल्यास आग होऊ शकते.
थोडे नवीन जरा जुने