घरकामाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करून गुप्तांगामध्ये मेणबत्ती खुपसली !


मुंबई : पतीशी भांडण करून मुंबईत आलेल्या २५ वर्षीय महिलेला काम देण्याचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या वांद्रे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

सलीम झवेरी (६०) असे आरोपीचे नाव आहे. वांद्रे बस स्टॉपजवळ बळीत महिला एकटीच उभी होती. आरोपीने विचारपूस केल्यानंतर महिलेने आपली समस्या सांगितली.

आरोपीने बळीताला घरकाम देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या फ्लॅटमध्ये नेले. त्यानंतर बळीताचा अविरत छळ सुरू केला. तिच्यावर वारंवार अत्याचार करून तिला शारीरिक यातना दिल्या. यात त्याने विकृतपणाचा कळस गाठला आणि या तरुणीच्या गुप्तांगामध्ये मेणबत्ती खुपसली. यामुळे बळीताच्या गुप्तांगातून रक्तस्राव होऊ लागला.  आणि  तिला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

उपचारादरम्यान डॉक्टरांनी तरुणीला अजा कशी झाली असा प्रश्न विचारला असता तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला.

त्यानंतर याप्रकरणी वांद्रा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
थोडे नवीन जरा जुने