निरोगी त्वचेसह चेहरा तेजस्वी ठेवण्यासाठी "अशा" प्रकारचा आहार आहे गरजेचा.त्वचेतील ओलावा आणि रंग सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक उपचार करणे फायद्याचे ठरते. अल्ट्राव्हायलेट (अतिनील)किरणांचे वाईट परिणाम रोखणे, त्वचेवरील सुरकुत्या मिटवणे आणि त्वचेचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. जाणून घेऊया अशाच काही खाद्यपदार्थांविषयी.

पत्ताकोबी :
दररोज पत्ताकोबीच्या केवळ सहा पानांचे सेवन केल्यास ‘अ’ जीवनसत्त्वाची 100 टक्के पूर्तता होते. तसेच त्वचेचा रंगही उजळतो. यातील खनिजे आणि पोटॅशियममुळे (पालाश) त्वचा उजळते आणि रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो.

सफरचंद :
सफरचंदाच्या सालीमध्ये असलेल्या भरपूर अँटिऑक्सिडंट्समुळे अतिनील किरणांच्या दुष्परिणामांपासून बचाव होतो. ही किरणे त्वचेच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना एका सफरचंदाचे सेवन करावे.

सोयाबीन :
30 वर्षांनंतर त्वचेवर येणार्‍या सुरकुत्या दूर करण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी सोयाबीनपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन करावे. सोयाबीनमध्ये अँग्लीकोन नावाचा एक नैसर्गिक घटक आढळून येतो. एका संशोधनानुसार सोयाबीन पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेह, स्तनाचा तसेच गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.

अंडी :
यामध्ये ल्युटेन आणि जियेक्जांथिन नावाचे दोन अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. यामुळे अतिनील किरणांपासून बचाव होतो. त्वचेवर पडणारे डाग, सुरकुत्या आणि कर्करोगाची शक्यता कमी होते. हे अँटिऑक्सिडंट्स त्वचेची कोमलता कायम राखतात.

बदाम :
बदामाचे नियमित सेवन केल्यास ‘ई’ जीवनसत्त्वाच्या पातळीत वाढ होते. बदाम हा त्वचेसाठी असलेला महत्त्वाचा अँटिऑक्सिडंट आहे. बदामामुळे त्वचेचा रुक्षपणा दूर होईल आणि उजळपणा कायम राहील.


आक्रोड :
यामध्ये असलेले अल्फा-लायनोलेनिक अँसिड (आम्ल) हे एक ओमेगा-3 फॅटी अँसिड आहे. हे आम्ल त्वचेचा ओलावा कायम ठेवते.
थोडे नवीन जरा जुने