आयुष्यात वाईट काळ आल्यानंतर आपण काही करू शकत नाही, तेव्हा देवावर विश्वास ठेवा


प्राचीन लोककथेनुसार, जंगलात एक मादा हरीण गर्भवती होती. जंगलात इतरही मांसाहारी प्राणी होते. यामुळे हरिणी आपल्या मुलाच्या सुरक्षेविषयी चिंतीत होती. जंगलात खूप शोध घेतल्यानंतर एका झुडुपात ती लपली आणि प्रसव होण्याची वाट पाहू लागली.
> रात्री हरीणीच्या पोटात खूप वेदना होऊ लागल्या. तेवढ्या जोराचा पाऊस सुरु झाला, हवा सुटली. एक कडाक्याची वीज चमकली आणि झाडावर पडली, यामुळे झाडाला आग लागली. हरिणीला झाडाच्या मागे एक शिकारी धनुष्यबाण घेऊन उभा असलेला दिसला. परंतु ती पळण्यास असमर्थ होती कारण तिचे पोट खूप दुखत होते.

> हरिणीने जीव एकवटून पुढे जाण्याचा प्रयत्न केला परंतु तिला पुढेच एक वाघ उभा असलेला दिसला. आता मात्र हरिणीला काय करावे हे सुचेना, शिकारी आणि वाघापासून कशी सुटका करावी याचा प्रश्न तिला पडला?

> तिने मन शांत केले आणि देवाचे ध्यान करू लागली. देवावर विश्वास ठेवत तिने एका मुलाला जन्म दिला. त्याचवेळी एक वीज शिकाऱ्याच्या पडली आणि त्याच्या हातामधून बाण सुटून वाघाला जाऊन लागला. पाऊस सुरु असल्यामुळे झाडाला लागलेली आगही विझून गेली. अशाप्रकारे हरीण आणि तिचे बाळ सुरक्षित राहिले. हा चमत्कार पाहून हरिणीला खूप आश्चर्य वाटले.

कथेची शिकवण अशी आहे की, जीवनात वाईट काळ आल्यानंतर आपण काही करू शकत नसलो तरीही देवावर विश्वास ठेवावा. भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी देवता नेहमी मदत करतात. वाईट परिस्थितीमध्ये मानसिक संतुलन बिघडू देऊ नये, धैर्य कायम ठेवावे आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहावे. जे काही घडणार आहे ते देवावर सोडावे.
थोडे नवीन जरा जुने