कोरफडीचे "हे" औषधी गुणधर्म तुम्हाला माहित असलेच पाहिजे !कोरफडीचा वेगवेगळ्या आजारात उपयोग करता येतो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे. सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड रसाचा सर्रास वापर केला जातो, पण यात असलेले इतर गुण विविध आजारांवर सुद्धा गुणकारी ठरतात.
कोरफड ‘व्हिटामीन बी 12’चा चांगला स्रोत आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवणे, मधुमेहाने त्रस्त रोगींना, संसर्गविरोधी, वेदना कमी करणारे आणि कीटाणूनाशक असे गुण असल्याने कोरफड उपयुक्त वनस्पती ठरते.


कोरफड जेल कामाची वस्तू : 


कोरफड जेल शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. अनेक आजारांत याच्या रसाचे सेवन केले जाते. बहुतांश आजारात कोरफडीचा ताजा रस रामबाण उपायाचे काम करतो.


सांधेदुखीत उपयोगी : 

सांधेदुखी आणि अंगदुखीने पीडित असणार्‍यांनी कोरफड रसाचे सेवन केल्यास आराम मिळतो. यामुळे शरीरात अँटीबॉडीज घटक आणि पांढर्‍या रक्तपेशी निर्मिती होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सूज कमी होण्यास मदत होते. मुक्का मार लागलेल्यावर देखील कोरफड उपयुक्त ठरते.


मूत्रपिंडात प्रभावशाली : 

मूत्रपिंडाशी संबंधित संसर्गात (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) कोरफड जेल गुणकारी ठरतो.एखाद्याला अशी समस्या असल्यास कोरफडीच्या ताज्या जेलमध्ये पाणी आणि साखर मिक्स करून रस तयार करावा. हा रस पिल्यास संसर्गाची समस्या दूर होते. सोबत लघवीवेळी होणारी जळजळ कमी होते.

एखादा अवयव लचकल्यास कोरफडीच्या ताज्या गरात थोडी हळद आणि सैंधव मीठ टाकून हलके गरम करावे. हे मिर्शण लचकलेल्या भागावर बांधावे.


जळालेल्या किंवा चटका बसलेल्या भागावर तत्काळ कोरफडीचा ताजा गर लावल्यास फोड येत नाहीत.


मायग्रेनने डोकेदुखी होत असल्यास कपाळावर कोरफड जेल लावावा. लगेच आराम मिळतो.


पोटदुखी होत असल्यास कोरफडीच्या गरावर थोडेसे मीठ टाकून खाल्ल्यास पोटाला आराम मिळतो.
थोडे नवीन जरा जुने