जाणून घ्या, व्यायामाआधी पाणी पिणे चांगले कि व्यायामानंतर ?अनेकदा योग व्यायामानंतर स्नायू दुखू लागतात. मात्र, हे दुखणे व्यायामामुळे उद्भवते असे नाही. स्नायू का दुखतात याची कारणे जाणून घ्या. ही माहिती कोणतीही व्याधी नसणाऱ्यांसाठी आहे.
आहाराच्या बाबतीत सजगता : शरीरात काही कमतरता असेल तर आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. प्रथिन, जीवनसत्त्व, खनिज संतुलित ठेवा. व्यायामापूर्वी, नंतर आणि दरम्यान पुरेसे पाणी प्या. क्रॅम्प्समुळेही वेदना होतात.

डोम्स : अनेकदा व्यायाम केल्याने नरम पेशींमध्ये वेदना होतात. वैद्यकीय भाषेत याला मायक्रो टीअर्स किंवा डोम्स म्हणतात. डोम्स म्हणजे डिलेयड ऑनसेट ऑफ मस्क्युलर सोरनेस. यामुळे खांदे, छाती, बायसिप्समध्ये वेदना होतात. वेदना कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करा. यामुळे दीर्घकाळ दुखापत होण्याच्या शक्यता कमी होतात. ७२ तासांच्या आत वेदना शमल्या नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेदना होत असताना स्ट्रेचिंग केल्याने समस्या वाढू शकते. सोरनेस पुन्हा उद््भवू नये यासाठी संपूर्ण आराम गरजेचा आहे.


अतिरिक्त, अतिशीघ्र : मोठे ध्येय ठेवून अनेक जण जास्त व्यायाम सुरू करतात. लवकर परिणामांची अपेक्षा असते. जास्त वजन उचलणे, जास्त धावणे इत्यादी. त्यामुळे वेदना गंभीर होऊ शकते. व्यायामाचे प्रमाण वेळ अचानक वाढवू नका


चुकीचे पॉश्चर : नवे व्यायाम किंवा नव्या हालचाली करण्यापूर्वी पॉश्चरकडे लक्ष केंद्रित करा. चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे सांध्यामध्ये मोठे दुखणे निर्माण होऊ शकते. स्ट्रेंथ ट्रेनिंगनंतर सोरनेसमुळे लॅक्टिक अॅसिड बिल्ट-अप होऊ शकते. स्नायूंत लॅक्टिक अॅसिड कमी असल्याने दुखू लागते. मॉडरेट एक्झरसाइज करा. व्यायामापूर्वी वॉर्मअप करा. नंतर कूल डाऊन करा.
थोडे नवीन जरा जुने