जंकफूड खाताय? मग सावधान ! हे आहेत दुष्परिणाम


जंकफूडचे सेवन कमीतकमी करण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ नेहमीच देत असतात. पण त्यामागची गंभीर कारणं लक्षात घेतली तर तज्ज्ञांच्या सल्ल्यामागील कळकळ आपल्या लक्षात येईल.

यकृतासाठी घातक : वेगवेगळ्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, पिझ्झा, शीतपेय, बिस्किट अशा रेडिमेड पदार्थांचे सेवन मुलं अधिक प्रमाणात करतात. यामुळे यकृताच्या समस्या निर्माण होतात; कारण या पदार्थांमध्ये असलेलं फुक्टोज आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे यकृतात फॅट्स जमा होतात. यामुळे नॉन अल्कोहोलिक फैटी लिव्हर डिसीज होऊ शकतो.

किडनीशी संबंधित आजारांची शक्यता :

ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनानुसार, खूप जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन करण्याने किडनी खराब होते आणि यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती होऊ शकत नाही.


मेंदूचंही नुकसान होतं :

गरजेपेक्षा जास्त तेल आणि स्निग्ध पदार्थ खण्याचा आपल्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. अधिक प्रमाणात तेल आणि तुपाचं सेवन करण्याने आपल्या स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अशावळेस वाढलेला रक्तदाब आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल यामुळे रक्ताचा मेंदूला पुरेसा पुरवठा होत नाही. परिणामी मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.
थोडे नवीन जरा जुने