तेजस्वी सुंदर डोळे हवे असतील तर, मग हे वाचा !


11 व्या शतकात कानानेली यांनी लिहिलेल्या रसायन विज्ञानाच्या पांडुलिपीत अनेकदा औषधीशाला या शब्दाचा वापर ईश्वराने या जगाची निर्मिती अनेक रंगांच्या मिश्रणातून केली आहे. सूर्याची सप्तरंगी किरणे, समुद्रतळातील मोती, शिंपले, खळाळणा-या नद्या, बर्फाच्छादित हिमालय, प्रत्येक ठिकाणी नाविण्य आहे. 

ब्रह्मांडाच्या प्रत्येक निर्मितीत विविधता आणि सौंदर्य आहे. हे सारे पाहण्यासाठी एक अदभुत इंद्रिय आहे, त्याचे नाव डोळे. ज्ञानेंद्रिय डोळ्यामुळे आपल्याला सृष्टीची विविध रुपं अनुभवता येतात.

डोळ्यांचे हे महत्त्व ध्यानात घेऊनच कवींनी डोळ्यांची महती गायलीय. डोळ्यांवर रचना केल्यात. डोळ्यांची काळजी करण्याची परंपराही आपल्या देशात शेकडो वर्षांपासून चालत आलीय. कधी सुरमा नावाने तर कधी काजळ नावाने डोळ्यात घालण्यासाठीचे द्रव प्रचलित होते. आयुर्वेदही यात मागे नव्हते.

रस्त्याच्या आणि शेतीच्या कडेने मिळणा-या पिवळा धोतरा या वनस्पतीचे तेल विषारी असते. या वनस्पतीसारखीच दिसणारी दुसरी एक वनस्पती असते. त्या वनस्पतीचा वापर डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी करतात.

नीलगिरी, हिमालय, भूतान आदी भागात ममीरा नावाची वनस्पती मिळते. या वनस्पतीच्या मुळांना रसवंती म्हणतात. यापासून तयार केलेल्या काजळीमुळे डोळे तेजस्वी होतात.

अशा अनेक वनस्पती आहेत. हजारो वर्षांपासून त्या वनस्पतींचा वापर करण्यात येत आहे. बार्बेरिन नावाचे रसायन या वनस्पतींमध्ये असते. डोळ्यांसाठी हे रसायन गुणकारी आहे.
थोडे नवीन जरा जुने