शरीराला निरोगी ठेवण्याचे 'हे' आहेत पाच अद्भुत उपाय ! नक्की वाचा !शरीरात थोड्याशा वेदना होताच आपण डॉक्टरांकडे जातो. मात्र, अनेक आरोग्य समस्यांचे उपाय नैसर्गिक पद्धतीने करणे आता शक्य आहे. असे अनेक उपाय तुम्हाला विचित्र वाटतील, पण हे उपाय केल्यास आरोग्य समस्या सुटतात आणि या उपायांचे कोणतेच दुष्परिणामही दिसून येत नाहीत, असा दावा नैसर्गिक चिकित्सेशी संबंधित तज्ज्ञांनी केला आहे.
पेन्सिल (तणावासाठी) : तणाव असल्यास एक पेन्सिल दातांमध्ये ठेवावी. मात्र, पेन्सिल चावू नये. तणाव असल्यावर पीडित साधारणपणे दात किंवा हिरड्या चावतो. यामुळे संबंधित स्नायूंमध्ये ताण पडतो आणि डोके दुखायला लागते. अशावेळी पेन्सिलीमुळे स्नायू सैल राहतील.

ऑलिव्ह ऑइल (एक्झिमासाठी) : त्वचारोग झाल्यास त्वचेच्या त्या भागाला ऑलिव्ह ऑइल लावावे. या तेलात असलेले भरपूर अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे रूप पूर्ववत करण्यास मदत करतात. तसेच यामुळे त्वचेवर कोणतेही डाग पडत नाहीत आणि त्वचेचा ओलावाही कायम राहतो.

टेनिस बॉल (पाय दुखणे) : टेनिस बॉल घ्या आणि पायाच्या पंजाच्या मधोमध ठेवून त्यावर हलका भार देत थोडा वेळ हालचाल करा. ही क्रिया पायांना मालिश केल्यासारखी असेल. यामुळे पायांचे स्नायू ताणतील आणि आर्कला (पंजाची बोटे आणि टाचेच्या मधला भाग) आराम मिळेल. एक किंवा दोन मिनिटे असे केल्यास लवकर आराम मिळतो. पायदुखीवर हा सोपा उपाय आहे.

आइस्क्रीम (तोंड भाजल्यावर) : घाईघाईत गरम खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास तोंड जळते. त्यावेळी लगेच आइस्क्रीम खावे. याशिवाय तुम्हाला थंड दहीदेखील खाता येईल. कोणतेही गरम पदार्थ खाल्ल्यास तोंडातील टाळू सहज जळते. कारण टाळूच्या उती अतिशय पातळ असतात.

सफरचंद (पांढ-याशुभ्र दातांसाठी) : सफरचंदामधील मेलिक अ‍ॅसिडमुळे दातांची चमक परत मिळवता येते. याचे सेवन केल्याने कॅव्हिटी जमा होण्याची शक्यताही कमी असते.
थोडे नवीन जरा जुने