हृदयाच्या आजारवर सोयाबीन फायदेशीर आहे का ? वाचा


मुंबई : सोयाबीनला प्रोटीनयुक्त आहार मानला जातो. सोयाबीनच्या सेवनाने शरीरास अनेक फायदे होतात. प्रोटीनचा उत्तम सोर्स म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो. सोयाबीन मध्ये लॅक्टोज नसल्याने ते नीट पचते. या कारणामुळेच अनेक बेबी फूड्समध्ये सोयाबीनचा वापर होतो.

सोयाबीनमध्ये लेसीथिन असते जे आरोग्याला फारच फायदेशीर असते.

हृदयाच्या आजारवरही सोयाबीन फायदेशीर असते. हृदयाचा आजार असणाऱ्या लोकांनी सोयाबीनचा वापर अहारात करावा असा सल्ला डॉक्टरही देतात.

काही मानसिक अजार असेल तर आपल्या आहारात सोयाबीनचा जरूर समावेश करा. सोयाबीन मानसिक संतुलनावर प्रचंड प्रभावी असते.

सोयाबीनच्या नियमित सेवनाने नखे कमकुवत होण्याची समस्याही दूर होते. सोयाबीन खाल्ल्याने नखांना मजबूती मिळते तसेच नखे चमकदार होतात.

केस लांब, घनदाट वा काळेभोर हवे असतील तर सोयाबीनचे नियमित सेवन करा. सोयाबीनमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे केस काळेभोर आणि घनदाट होतात.

सोयाबीन मधील कॅल्शियममुळे दात आणि हाडांचं आरोग्य चांगलं राहतं. कोलीनमुळे स्मरणशक्ती उत्तम राहते
थोडे नवीन जरा जुने