हिरवे वाटणे आहारात समाविष्ट करा हे होतील फायदे



हिवाळ्यात बाजारात हिरव्या वाटाण्याच्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. खाण्याच्या विविध पदार्थांत रंगत आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाटण्यांमध्ये अनेक पोषकद्रव्ये आढळतात. तसेच आरोग्यदृष्ट्या वेगवेगळ्या समस्यांपासून दूर राहण्यासही हिरव्या वाटण्याचा आहारात नियमित समावेश केल्याने चांगला उपयोग होतो.

हिरव्या वाटण्यांमध्ये व्हिटामीन 'के' भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होतात. हे व्हिटामीन ऑस्टियोपोरोसिसच्या विरोधात चांगले काम करते. एकूणच हिरवे वाटाणे एक पॉवर बुस्टरसारखे काम करते आणि चांगले आरोग्य राखण्याच्या दृष्टीने उपयोगी खाद्य आहे. हिरव्या वाटण्यात शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू न देणारे आरोग्यदायी घटक असतात.

हिरव्या वाटाण्यात शरीरात ट्रायग्लिसरीन कमी करणारे गुण असतात आणि याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राहते. शरीरातील अनेक व्याधीही वाटाण्याच्या नियमित सेवनाने दूर होतात. हिरव्या वाटाण्यांच्या नियमित सेवनाने हृदयविषयक समस्याही दूर होतात.

यातील ॲन्टी इन्फ्लेमेट्री कंपाऊंड आणि भरपूर प्रमाणात असलेले ॲन्टी ऑक्सिडेंट कंपाऊंड या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे हृदयविषयक आजारांचा धोका कमी होतो..
थोडे नवीन जरा जुने