मुरूम येत असतील तर हे उपाय ठरतील फायदेशीर !त्वचेच्या खाली असणाऱ्या सिबेशस ग्रंथीतून त्वचेला आर्द्रता देण्यासाठी तेल निघतं. ही ग्रंथी चेहरा, पाठ, छाती आणि खांद्यांवर असते. जर ही जास्त सक्रिय झाली तर रोमछिद्रं चिकट होऊन बंद होतात. त्यामध्ये जीवाणूची निर्मिती होते. ज्यामुळे मुरूम येतात. जंक फूड, सॅच्युरेटेड फॅट्स, हायड्रोजेनेटेड फॅट्स, पशु उत्पादनांचा वापर तसेच कुपोषण व प्रदूषणामुळेही मुरूम येतात .
रोखण्यासाठी .

फायबर्सयुक्त पदार्थांचं सेवन अधिक प्रमाणात करा . यामुळे पोट साफ होत आणि विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडतात . झिंकयुक्त आहाराचं सेवन करा म्हणजे शेलफिश. सोयाबीन , अख्खी धान्यं , सुकामेवा, झिंक अँटीबॅक्टेरिअल असते. लो फॅट दह्याचा आहारात समावेश करा. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि आयोडीनयुक्त मिठाचा वापर कमी करा. मासे आणि कांद्यामध्ये आयोडीन असतं. आयोडीनच्या अधिक सेवनाने मुरूम वाढतात.

या गोष्टींची काळजी घ्या -
रोज कमीतकमी १५ मिनिटं उन्हात बसा. व्यायाम करा आणि पूर्ण झोप घेण्यावर भर देणं फायदेशीर ठरतं. मुरमांना नखाने फोडण्याचा प्रयत्न कर नका, यामुळे ते अधिकच वाढतात. हात स्वच्छ केल्याशिवाय प्रभावित त्वचेला स्पर्श करू नका. अँटीबायोटिक क्रिम किंवा टॅबलेटमुळे हानिकारक बॅक्टेरियांबरोबरच त्वचेला फायदा पोहचविणारे बॅक्टेरियाही नष्ट होतात, म्हणून अँटीबायोटिक औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
थोडे नवीन जरा जुने