तुम्ही वंशज असाल तर पुरावे घेऊन या...


पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले  यांच्यावर हल्लाबोल केला. पुण्यातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुस्तक वादावरुन उदयनराजेंवर हल्ला चढवला. 

संजय राऊत म्हणाले, उदयनराजे हे माजी खासदार आहेत. शरद पवार हे जाणते राजे आहेत, त्यांना लोकांनी उपाधी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांवर कुणाची मालकी राहू शकत नाही. उदयनराजे यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे”, असा हल्ला राऊतांनी केला.

शिवसेनेने पक्षाला नाव देण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न विचारताना उदयनराजेंनी शिवसेनेला ठाकरे सेना नाव लावण्याचा सल्ला दिला होता.

ही महाविकास आघाडी आहे की महाशिवआघाडी आहे? कारण उदयनराजे म्हणाले की शिव हा शब्द काढून टाकला, याबाबत तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “ते काय बोलतात साताऱ्यात, ते त्यांचा प्रश्न आहे. लोकशाही आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेताना शिवशाहीही म्हणतो. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपचे माजी खासदार आहेत. त्या पक्षाचे नेते आहेत. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत”.

उदयनराजे असेही म्हणतायेत की शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं नव्हतं.यावर राउत म्हणाले 
छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे. आम्ही जेव्हा गणपतीची पूजा करतो तेव्हा विचारायला जात नाही तुझी पूजा करतोय म्हणून.

थोडे नवीन जरा जुने