कारल्याचे "हे" दुष्परिणाम तुम्हाला माहित असलेच पाहिजे !कारले. याचा उल्लेख झाला तरी त्याचे फायदे आपल्या मनात उमटतात. मधुमेह असलेल्या नागरिकांसाठी तर कारले एक वरदान आहे. कारल्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहाते. त्यामुळे एखाद्या दिवशी घरी जास्त गोड खाण्यात आले असेल तर दुसऱ्या दिवशी घरी कारल्याची भाजी असल्याशिवाय राहत नाही. 


पण कारल्याचे केवळ लाभच आहेत, की त्याचे काही SIDE EFFECTSसुद्धा आहेत... आम्ही शोध घेतला तेव्हा कारल्याचे सहा तोटे असल्याचे आढळून आले.

रक्तातील तांबड्या पेशी कमी होण्याची शक्यता


कारल्याचे सेवनाने Hypoglycemia Anaemia जाणवू शकतो. यामुळे कोमा, पोटदुखी, डोकेदुखी आणि ताप यासारखी लक्षणे दिसू शकतात. रक्ताची कमतरता किंवा तांबड्या पेशींची कमतरता झाल्याने शरीरात असे बदल होऊ शकतात. त्यामुळे भाज्या खाताना त्यांचे प्रमाण संतुलीत असावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


मिसकॅरेज किंवा मेनस्ट्रुएशनचा धोका

गरोदर असताना कारल्याचे सेवन न केलेले बरे. कारल्यात मोमोचारिन टॉक्सिक आढळून येते. यामुळे बऱ्याच वेळा मिसकॅरेज होऊ शकते. कारल्याचा रस सेवन करणाऱ्या बहुतांश महिलांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात त्यांनी मिसकॅरेजची समस्या सांगितली आहे. कारल्यामुळे मेनस्ट्रल ब्लिडिंग होऊ शकते. गरोदर असताना अशा स्वरुपाचा रक्तस्त्राव धोकादायक ठरू शकतो. काही प्राण्यांवर याची चाचणी करण्यात आली. त्यावेळी सिद्ध झाले, की कारल्याचे सेवन केल्याने मिसकॅरेज होऊ शकते.


लहान मुलांसाठी अयोग्य

कारल्याचे सेवन केल्याने लहान मुलांमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होणे आणि अचानक काही मेडिकल इमरजन्सी उद्भवणे यासारखे प्रकार घडू शकतात. कारल्याच्या बियांमध्ये असलेल्या टॉक्सिक एलिमेंटमुळे असे होते. डोकेदुखी, अस्वस्थ वाटणे, अन्नाचे पचन न झाल्याने पोटदुखी आणि डायरीया यासारखे विकार होऊ शकतात. त्यामुळे वयस्क झाल्यावरच कारल्याचे सेवन केल्याचे योग्य असते.


लिव्हर आणि किडनी रुग्णांसाठी योग्य नाही

लिव्हर आणि किडनी रुग्णांनी कारल्याचे सेवन करु नये. कारल्यामुळे enzyme चे लिव्हरमधील प्रमाण वाढते. त्यामुळे लिव्हरच्या रुग्णांनी याचे सेवन कटाक्षाने टाळावे. कारल्याच्या बियांच्या आवरणांमध्ये टेक्टिन टॉक्सिक आढळून येते. कारले पचनालाही जड असले. त्यामुळे किडनी रुग्णांनी याचे सेवन करु नये.


फर्टिलिटीवर विपरित परिणाम

जर तुम्ही बाळाचे प्लॅनिंग करीत आहात अशा वेळी कारल्याचे सेवन करू नका. कारल्यामुळे मेल आणि फिमेल फर्टिलिटीवर विपरित परिणाम होतो. श्वानावर करण्यात आलेल्या चाचणीत आढळून आले आहे, की कारल्याच्या सेवनाने त्याचे स्पर्म कमी होतात. यासंदर्भात मनुष्यावर सखोल संशोधन झालेले नाही. पण अशा वेळी कारले न खाल्लेले बरे.


रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होते

कारल्यामुळे रक्तातील सारखेचे प्रमाण कमी होते. पण यामुळे ग्लुकोज कमी झाल्याने येणारा कोमाही होऊ शकतो. अशा वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यल्प होते. त्याचा परिणाम मेंदूवर होतो. insulin, chloropropamine, phenformin आणि glyburide औषधे सुरु असताना कारल्याचे सेवन करु नये. त्याचा विपरित परिणाम होतो.
थोडे नवीन जरा जुने