प्रेमात बुडालेली शिक्षिका आठवीच्या विद्यार्थ्याला घेऊन झाली फरार !गांधीनगर – शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षिकेचा एका विद्यार्थ्यावर जीव जडला. प्रेमात अखंड बुडालेली ही 26 वर्षीय शिक्षिका अवघ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन पळाल्याचा प्रकार गुजरातमधील गांधीनगर येथे उघडकीस आला आहे. या शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध होते, अशीही माहिती आता समोर आली आहे.
अल्पवयीन (वय 14) असलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिस स्टेशन गाठून या शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, शिक्षिकेने विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले होते. आता ती त्याला घेऊन पसार झाली आहे. पोलिसांनी शिक्षिकेच्या घरी जाऊन चौकशी केली. परंतु, शिक्षिका घरी सापडली नाही.

एका शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध बनवून त्याला घेऊन पलायन केल्याची घटना घडल्याने पोलिसही चक्रावले आहेत. मुलाचे वडील गांधीनगर उद्योग भवनमध्ये सरकारी कर्मचारी आहेत. मुलगा नियमित शाळेत जात होता. तसेच तो अभ्यासातही हुशार होता. त्यामुळे त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही, असे मुलाच्या वडिलाने पोलिसांना सांगितले.

शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता कार्यालयावरून घरी आल्यानंतर पत्नीने सांगितले की, मुलगा अद्याप घरी आला नाही. त्यामुळे मी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. परंतु, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीवरून शिक्षिकेविरोधात कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक के. के. देसाई यांनी दिली. शिक्षिका व मुलाकडे फोन नसल्याने ते दोघे सध्या कुठे आहे, हे शोधणे कठीण आहे, असे देसाई यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने