हे आहेत,गौतम बुद्धाचे दहा अमूल्य विचार...


१. जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय प्राप्त करा. मग विजय नेहमी तुमचाच होईल. 


२. कोणत्याही परिस्थितीत तीन गोष्टी लपून राहू शकत नाहीत, सूर्य, चंद्र आणि सत्य.

३. जीवनात कोणत्याही उद्देश किंवा लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या पद्धतीने करणे, हे महत्त्वपूर्ण आहे.

४. वाईटाने वाईटावर कधीही मात करता येत नाही. तिरस्काराला केवळ प्रेमाने संपवलं जाऊ शकतं.

५. सत्याच्या मार्गावर चालणा-या व्यक्ती केवळ दोन चुका करू शकतात. पहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग न निवडणे आणि दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे.

६. भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका, भूतकाळात गुंतू नका, फक्त वर्तमानकाळावर लक्ष केंद्रीत करा.

७. ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून हजारो दिवे प्रज्वलित करता येतात, तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने तो नेहमी वाढतो, कधीही कमी होत नाही.

८.जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकाचे वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका. मात्र, जोपर्यंत हे सर्व तुम्ही आचरणात आणत नाही, तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही.

९.नेहमी रागात राहणं, म्हणजे जळलेल्या कोळशाला दुस-या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने पकडून ठेवण्यासारखे आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो.

१०. रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होते.
थोडे नवीन जरा जुने