स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत इंदूर देशात नंबर वन, तर महाराष्ट्रातील 'हे' शहर...


नवी दिल्ली -  स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात मध्य प्रदेशातील इंदूरने पुन्हा एकदा देशात अव्वल स्थान मिळवले आहे. केंद्रीय राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी मंगळवारी शहरांची यादी जाहीर केली.
 
यात १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांत इंदूर पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत अव्वल राहिले. भोपाळ दुसऱ्या स्थानी राहिले. पहिल्या तिमाहीत सुरत हे तिसऱ्या स्थानावर होते. 

दुसऱ्या तिमाहीत मात्र आता मुंबईने तिसरे स्थान पटकावले आहे. इंदूर सलग तीन वर्षांपासून देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. आता चौथ्या वेळीही हे स्थान पटकावण्यासाठी या शहरात जोरदार तयारी सुरू आहे.

राजधानी दिल्ली एनसीआरमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत दिल्ली वगळता इतर क्षेत्रात चांगले काम सुरू आहे. दिल्लीच्या या वाईट प्रदर्शनाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जबाबदार असल्याचे पुरी म्हणाले.
थोडे नवीन जरा जुने