आपल्याला दु:खामधून कायमची मुक्ती मिळेल काय, कशी?


आणी जन्म कां आला? ह्याचे कारण तुकाराम महाराज सांगतात 

जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून  दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥
पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी  नरदेही येऊनी हानी केली   

महाराज म्हणतात की पापे अथवा पुण्यकर्मे केल्यामुळे जीवात्म्याला जन्म येतो. आपण पहातोच की ह्या पृथ्वीव्रर अनंत प्रकारचे प्राण्य़ाचे प्रकार आहेत. आपल्याकडे असे म्हटले जाते की ८४ लक्ष प्रकारचे प्राणी आहेत. 

त्यांमधे माणूस पण येतो. भागवत असे सांगते की जेंव्हा पाप व पुण्य बरोबरीचे होतात तेंव्हा माणसाचा जन्म येतो.
एक माणूसच असा आहे की ज्याला विचार करण्याची , योग्यायोग्य समजण्याची क्षमता आहे.

 ईतर सर्व प्राणी आहार, निद्रा, भय( मृत्यूचे) ,मैथून हे व्यवहार करतच असतात. त्यांना पाप म्हणजे काय व पुण्य म्हणजे काय ते कळत नसते. 

शास्त्रे असे सांगतात की ईतर सर्व योनींमधे जन्म येतो ते फक्त पापकर्मांचःई फळे भोगण्याकरता व म्हणूनच शास्त्रे पुढे हे पण सांगतात की फक्त नरजन्मातच जीवाला “आपला जन्म कां झाला, आपल्याला दु:खामधून कायमची मुक्ती मिळेल काय, कशी?मला कोणी निर्माण केले? “ ईत्यादी प्रश्न पडतात व त्यांच्यावर विचार, मनन करता येते. चांगले कर्म म्हणजे काय ते कळते.
थोडे नवीन जरा जुने