संजय राउतचे मनासिक संतुलन बिघडले : राणे


मुंबई - भाजपाचे नेते व माजी खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे, असे थेट आव्हान देणारे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. 

संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची जोरदार टीका करतानाच छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, त्यांच्याबद्दल जर काय बोलाल तर जीभ जागेवर राहणार नाही, असा इशाराच राणे यांनी यावेळी दिला.
थोडे नवीन जरा जुने