शरीराला सुडौल बनवण्यासाठी 'ह्या' काही खास टिप्स आहेत खूपच फायदेशीर !जास्त प्रमाणात कॅलरी घेणे परंतु त्या बर्न न केल्याने लठ्ठपणा वाढतो. वजन कमी करण्यासाठी आहारात सुधार करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच येथे सांगण्यात आलेल्या टिप्स अवश्य लक्षात ठेवा. यामुळे तुमचे वजन लवकर कमी होईल.

1. नेहमी राहा एक्टिव्हवजन लवकर कमी करण्यासाठी सर्वात पहिली ट्रिक म्हणजे नेहमी अ‍ॅक्टिव्ह राहणे. कोणत्याही जिम किंवा पर्सनल ट्रेनरची काहीच आवश्यकता नाही, याउलट तुम्ही थोडासा व्यायाम करा. हळूळूहळू व्यायामाचा वेळ वाढवत राहा. दिवसभरात काही न काही काम करत राहा.

शरीर सुडोल करणारे  खास उपाय -
2. दररोज वॉकवर जावे


मॉर्निंग वॉक शरीरासाठी खूप लाभदायक मानला जातो. यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्याचे असल्यास सकाळी लवकर उठून फिरायला जावे. घराच्या जवळपास एखादे काम असल्यास गाडीचा उपयोग न करत चालत जावे. आरोग्यासाठी चालणे खूप आवश्यक आहे.3. एक आठवड्यात एक किलो

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच संतोष आवश्यक आहे. हा एखाद्या शर्यतीचा भाग नसून आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न आहे. स्वतःचे छोटे-छोटे ध्येय निश्चित करा, उदा. मला एक आठवड्यात एक किलो वजन कमी करायचे आहे. यामुळे आपण मागील आठवड्यात किती वजन कमी केले हे लक्षात येईल.

4. आहाराची लिस्ट तयार करा

वजन कमी करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे डाएट कंट्रोल करणे. आपल्या आहाराची लिस्ट तयार करा आणि त्यानुसार डाएट चार्ट तयार करा. डाएट वेळापत्रकाचे पालन केल्यास तुम्ही चांगला आणि नियंत्रित आहार घेऊ शकाल. तसेच जंक फूडपासून दूर राहाल.


5. मित्रांसोबत करा प्रयत्न

समूहामध्ये वजन कमी करावे. एका रिसर्चनुसार, जे लोक समूहात सर्वांसोबत राहून आपले वजन कमी करतात त्यांचे वजन लवकर कमी होते.


6. कुटुंबासोबत बसून जेवण करावे

जेव्हा आपण डाएटवर असतो, तेव्हा घरातील इतर सदस्यांना सोडून एकटेच जेवण करतो. डाएटमध्ये आपण सलाड किंवा फळांचा रस घेतो आणि घरातीली इतर सदस्य त्यांच्या आवडीचे पदार्थ खातात, परंतु आपण जेवणामध्ये सर्वजण खाऊ शकतील असे पदार्थ बनवल्यास डाएट बोरिंग वाटणार नाही.


7. टीव्हीसमोर बसून जेवण करू नका

जेवण नेहमी खाली बसून आणि शांततेत करावे. यामुळे तुम्ही नियंत्रित प्रमाणात आहार घ्याल. टीव्हीसमोर बसून जेवण करू नये, कारण टीव्हीसमोर बसून खाल्ल्याने आपण किती खात आहोत याकडे लक्ष जात नाही. यामुळे आपण अनेकवेळा गरजेपेक्षा जास्त खातो आणि वजन वाढवतो.8. उपाशी राहू नका

वजन वाढण्याचे एक मोठे कारण म्हणजे अवेळी खाणे किंवा उपाशी राहणे. वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास प्रत्येक तासाला काही न काही अवश्य खा, चुकूनही उपाशी राहू नका.


9. विचार सकारात्मक ठेवा

स्वतःचे विचार सकारात्मक ठेवा आणि विचार करा की, तुमची स्वतःवर नियंत्रण ठेवू शकता आणि लवकरच स्लिम होणार आहात. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका आणि तुम्ही जे काही करत आहात यामध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न करा.


10. स्नॅक्सपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा

इंडियन, चायनीज फिश असो वा या चिप्स हे सर्व पदार्थ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत आणि तुम्ही या पदार्थांशिवाय राहू शकत नसाल तर एखाद्यावेळी खाऊ शकता परंतु स्वतःला वाचन द्या की, तुम्ही दुप्पट वर्क आउट कराल.
थोडे नवीन जरा जुने