जाणून घ्या आपल्या अन्नाचे एनर्जीमध्ये रुपांतरीत कसे होते...
आपल्या शरीराची सर्वात महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे चयापचय. आपल्याला बोलणे, चालणे एवढेच नव्हे तर खाण्यासाठी ज्या उर्जेची गरज असे ती चयापचय (मेटाबॉलिझम)मधून मिळते.


मेटाबॉलिझम काय आहे ?

मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. शरीरात ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. यातून शरीराला ऊर्जा मिळत राहते आणि शरीरात पेशी तयार होण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी घटकांचेदेखील नियंत्रण केले जाते.

दोन प्रकारचे कार्य -


मेटाबॉलिझमची दोन गटांत विभागणी करता येईल. पहिला म्हणजे अँनाबॉलिझम. अँनाबॉलिझमला कंस्ट्रक्टिव्ह मेटाबॉलिझम देखील म्हणतात. हा नव्या पेशींच्या वाढीला मदत करतो. शरीरातील पेशींची दुरुस्ती करतो. भविष्यात वापराव्या लागणार्‍या ऊज्रेची साठवणून केली जाते. अँनाबॉलिझममध्ये लहान मॉलिक्यूल बदलले जातात, तर दुसरा प्रकार आहे मेटाबॉलिझम. याला डिस्ट्रक्टिव्ह मेटाबॉलिझमदेखील म्हणतात. या प्रक्रियेमध्ये पेशी पूर्णपणे काम करू शकतील यासाठी ऊर्जा निर्मिती केली जाते. यात मोठे मॉलिक्यूल्स तुटतात आणि ऊर्जा प्रभावित होते. आजारपणाच्या काळात ही प्रक्रिया शरीराला ऊर्जा देते. कॅटाबॉलिझम शरीराला उष्णता देतो आणि शरीराला हालचाल करण्यायोग बनवते.


समतोल अत्यंत महत्त्वाचा
सरासरी 70 किलोग्रॅम वजन असणार्‍या व्यक्तीला स्टेशनरी स्टेजमध्ये प्रतिमिनिट एक किलो कॅलरीची गरज असते. हाच मेटाबॉलिक रेट म्हटला जातो. तसे पाहिले तर मेटाबॉलिझम दोन प्रकारचा असतो. हाय आणि स्लो मेटाबॉलिझम. दोन्ही प्रकारचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो. म्हणून यामध्ये समतोल असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


स्लो मेटाबॉलिझम
जेव्हा शरीरात चयापचयाची प्रक्रिया मंदावते तेव्हा शरीर सुस्तावते. शरीराला गरमी आणि थंडीची जाणीव होते. रक्तदाब देखील कमी होतो. अशा स्थितीत व्यक्ती नैराश्यातदेखील जाऊ शकतो.

कशामुळे होते : तज्ज्ञांच्या मते अशी स्थिती हायपोथेडिज्म, कुपोषण, असंतुलित आहार, अँटिडिप्रेशन औषधांचे सेवन आणि व्यायाम न केल्याने होते.


हाय मेटाबॉलिझम
शरीरात जेव्हा मेटाबॉलिझमची प्रक्रिया वेगाने होते तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीर गरम होऊ लागते. हाय मेटाबॉलिझम झाल्यावर ताप येण्याची शक्यता आणि भूकदेखील वाढते.

कशामुळे होते : तज्ज्ञांच्या मते ही स्थिती ब्रेन हार्मोन आणि थायरॉइड हार्मोन वाढल्यामुळे होते. काही औषधांच्या परिणामामुळेदेखील हाय मेटाबॉलिझम होतो.


यामुळे वाढतो चयापचय वेग
लोव्हर लीन बॉडी मास
कमी उंची
वाढते वय
उच्च् काबरेहायड्रेट आणि उच्च् फॅटचा आहार
वारंवार उपवास

थायरॉइड फंक्शनची कमतरता

हे आवर्जून करा

मासे, सोयाबीन, आक्रोड, ऑलिव्ह ऑइल, नॅचरल पीनट्स बटर सारखे आरोग्यदायी फॅटयुक्त पदार्थ खावेत.

भूक लागेल तेव्हाच खावे. एकाच वेळी भरमसाट खाऊ नये तसेच दोन जेवणात जास्त अंतर नसावे.

दिवसभरात दोन ते लिटर पाणी अवश्य प्यावे. असे केल्याने चयापचयाचा वेग वाढतो आणि समतोल राहतो.

दररोज कमीत कमी सात ते आठ तासांची झोप गरजेची असते. झोप व्यवस्थित झाल्यास चयापचय वेग योग्य राहतो.
थोडे नवीन जरा जुने