ऑफिसच्या कामाने आलेला ताण दूर करण्यासाठी 'हे' उपाय करा !धका-धकीच्या आयुष्यात ऑफिसच्या कामामुळे आणि जास्ती कामाच्या वेळांमुळे ब-याच व्यक्तींना मानसिक आणि शाररिक ताणाचा सामना करावा लागतो. 


अतिरिक्त ताणामुळे कामात लक्ष न लागणे,अस्वथ वाटणे,वेळेत काम पूर्ण न केल्याने टेंन्शन येणे या समस्या उद्बवू शकतात. तुम्ही देखील या ताणांचा सामना करत असाल तर, खालील टिप्सचा उपयोग केल्याने तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.

ताण कमी करणारे ऍप डाउनलोड करा:
आपल्या हातातील मोबाइल जेवढा आपला ताण वाढवण्याचे काम करत असतो. त्याच पद्धतीने तो तुमचा ताण कमी करण्याचेही काम करत असतो. तुमचा ताण कमी करण्यासाठी असंख्य ऍप उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑफिसमध्ये असताना ताण कमी करण्यासाठी तुम्ही या ऍप्सची मदत घेवू शकता.


ब्रेक घ्या -
एकाच जागी काम केल्याने शरिराची हालचाल मंदावते. त्यामुळे साधरण अर्धा तासाच्या अंतराने आपल्या कामाच्या जागेवरुन बाहेर हवेत फिरुन या. यामुळे तुमच्या शरिराबर आणि मनाबर आलेला अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल.


कामाची यादी तयार करा -
ब-याच व्यक्ती कामाच्या बातबतीत गोंधळलेल्या असतात. तुम्ही जर ऑफिसमधून घरी जाण्यापूर्वी दुस-या दिवशी कोणती कामे करायची आहेत याची नोंद करुन ठेवल्यास तुमचा गोंधळ होणार नाही. यामुळे तुमचे काम वेळेत पूर्ण होईल आणि तुमच्यावर कामाचा अतिरिक्त ताणही पडणार नाही.


व्हिटॅमिन 'सी' चे सेवन:
तुमच्या रोजच्या आहारात व्हिटॅमिन 'सी' चे सेवन करा. एका अभ्यासादरम्यान असे लक्षात आले आह्रे की, व्हिटॅमिन 'सी' च्या सेवनामुळे ताण कमी होण्यास मदत होते.
थोडे नवीन जरा जुने