'हे' साधे-सोपे उपाय करून मिळवू शकता पिंपल्सपासून सुटका !


पिंपल्स ही खुप सामान्य समस्या आहे. जी मोठ्या प्रमाणात टिनएजर्समध्ये दिसते. तरुणपणात काही हार्मोनल बदल होत असतात. यामुळे चेहर्‍यावरील तेलीय ग्रंथी जागृत होतात आणि या ग्रंथींवर बॅक्टेरिया अटॅक करतात.

पिंपल्स येण्याची करणे


१. सामान्यत: पिंपल्स टीनएजमध्ये होतात, कारण या अवस्थेत शरीरातील सेक्स हार्मोन्स वाढतात.
२. जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने पिंपल्स येतात.
३. अनुवंशिकता आणि धुळीच्या अ‍ॅलर्जीमुळे पिंपल्स येतात.
४. कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा जास्त वापर केल्याने पिंपल्स येतात.
५. निर्जिव त्वचासुध्दा पिंपल्सचे कारण असु शकते.

हळह

हळद अँटीसोप्टिकचे काम करते. यामुळे यामध्ये बॅक्टेरिया संपवण्याची क्षमता असते.
१. एक चमचा हळद पावडर घ्या आणि घट्ट पेस्ट बनवा.
२. ही पेस्ट पिंपल्सवर लावा. काही मिनिट राहु द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धूवुन घ्या. एक आठवडा असे करा. पिंपल्स नष्ट होतील.

पुदीना
१. पुदीना शरीराली शितल ठेवते. सोबतच यामध्ये अँटीसोप्टीक गुण असतात.
२. पुदीन्याची काही पाने मिक्सर मधुन काठुन घ्या.
३. ही पेस्ट रात्रा झोपण्याआधी चेहर्‍यावर लावा किंवा ज्युस बनवुन लावा. हे रात्रभर चेहर्‍यावर लावुन ठेवा.
४. सकाळी चेहरा धुवून घ्या. आठवड्यातुन एक वेळा हे करा. पिंपल्स हळुहळू नष्ट होतील.


लिंबु
पिंपल्ससाठी लिंबु फायदेशीर आहेत. लिंबुमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.
१. दोन मध्यम आकाराचे लिंबु घेऊन ज्युस तयार करा.
२. लिंबुचा रस कॉटनच्या कपड्यात घेऊन चेहर्‍याला लावा. ते वाळल्यावर थंड पाण्याने धुवुन घ्या.
३. दिवसातुन दोन वेळा हे तीन-चार दिवस चेहर्‍यावर लावा. पिंपल्स नष्ट होतात.
लसुन
लसुनमध्ये अँटीफंगल तत्व असतात. यामुळे पिंपल्स लवकर दुर होतात.
१. लसुनच्या दोन कांड्या आणि एक लवंग दळुन घ्या.
२. ही पेस्ट फक्त पिंपल्सवर लावा. काही वेळ राहु द्या. नंतर धुवून घ्या.


टूथपेस्ट
टूथपेस्टचा उपयोग सगळे दात स्वच्छ करण्यासाठी करतात. परंतु याचा वापर पिंपल्स नष्ट करण्यासाठी सुध्दा केला जाऊ शकतो.
१. रात्री झोपण्याआधी टूथपेस्ट पिंपल्सवर लावा.
२. सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
३. पिंपल्सवर फक्त पांढरे टूथपेस्ट लावा.

वाफ
वाफ पिंपल्स नष्ट करण्यासाठी चांगला उपाय आहे. चेहर्‍यावर वाफ घेतल्याने रोम छिद्र उघडतात. यामुळे चेहर्‍यावरील घान नष्ट होते.
१. जेव्हा पिंपल्स होतील तेव्हा दिवसातुन दोन वेळा चार-पाच दिवस वाफ घ्या.
२. पिंपल्स नष्ट होतील आणि चेहरा चमकायला लागेल.


बर्फ
१. बर्फाचा तुकडा कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन चेहर्‍यावर लावा.
२. तीन-चार दिवस दिवसातुन दोन वेळा चेहर्‍यावर लावल्याने पिंपल्स नष्ट होतील.


संत्र्याची साल
संत्र्याची साल चेहर्‍यासाठी फायदेशीर असतात. संतर्‍याच्या साली सावलीत वाळवुन त्याची पावडर बनवा.
१. ही पावडर कमी पाण्यामध्ये मिसळुन चेहर्‍यावर लावा.
२. अर्ध्यातासा नंतर चेहरा धुवून घ्या. दिवसातुन दोन-तीन वेळा हा प्रयोग करा.
मध
मध हे एक नैसर्गिक एटीसेप्टिक आहे. पिंपल्सच्या समस्येसाठी हे रामबाण उपाय आहे.
१. कॉटन बॉल मधामध्ये बुडवुन चेहर्‍यावर लावा.
२. वाळल्यावर चेहरा धुवून घ्या.
पपई
पपईमध्ये सर्वात जास्त अँटीऑक्सीडेंट असतात. यामध्ये पिंपल्स लवकर संपवण्याची क्षमता असते.
१. एक पपई मिक्सर मधुन दळुन चेहर्‍यावर लावा. पपईचा ज्युससुध्दा चेहर्‍यावर लावाता येईल.
२. पंधरा ते वीस मिनिट चेहर्‍यावर लावा. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.


काकडीचा रसकाकडीमध्ये विविध पोषकतत्त्व असतात. उन्हाळ्यात त्वचेसाठी काकडी फायदेशीर असते.
१. काकडीचे साल काढुन तुकडे करा आणि मिक्सरमध्ये पेस्ट करा.
२. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. दिवसातुन दोन-तीन वेळा ही पेस्ट चेहर्‍यावर लावा.
३. काकडीच्या पेस्टमध्ये थोडा लिंबुचा रस आणि मध मिळवला तर त्वचा चमकदार होइल.


अ‍ॅपल सायडर व्हीनेगरअ‍ॅपल सायडर व्हीनेगर त्वचेसाठी खुप फायदेशीर आहे.
१. अ‍ॅपल साइडर व्हीनेगरमध्ये कॉटन बुडवून चेहर्‍यावर लावा.
२. ते वाळल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. दिवसातुन दोन-तीन वेळा चेहर्‍यावर लावा. पिंपल्स नष्ट होतील.

टोमॅटो१. टोमॅटो बारीक करून ज्युस बनवा. हा ज्युस गाळुन चेहर्‍यावर लावा. वाळल्यावर चेहरा धुवून घ्या.
२.दिवसातुन दोन-तीन वेळा चेहर्‍यावर लावा. पिंपल्स नष्ट होतील.
थोडे नवीन जरा जुने