पतंगामागे पळताना विहिरीत पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू !


स्वच्छ आकाश आणि अनुकूल हवेत सकाळपासूनच पतंगांचा खेळ रंगला हाेता. सकाळी ८ पासून नायगाव रस्त्यावर १०-१२ वर्षांची पाच-सहा मुले आकाशातील पतंगांची काटाकाटी पाहण्याचा आनंद लुटत हाेती. तेवढ्यात एक पतंग कटला. झपकन खाली येत गिरक्या घेत जाऊ लागला. ताे पकडण्यासाठी मुले पडीक शेतात धावू लागली. आर्यन विलास नवाळे (१२) सवंगड्यांना मागे टाकत पुढे धावला. 

त्याच्या बाजूने आदित्य पगार (११) धावत हाेता. पतंगाकडे वर पाहताना कठडे नसलेली विहीर नजरेतून सुटली अन‌् आर्यन विहिरीत काेसळला. मागून आलेल्या आदित्यने झुडपाची फांदी घट्ट पकडून स्वत:ला विहिरीत पडण्यापासून वाचवले. ताे जिवाच्या आकांताने वर आला आणि गाेंधळून घाबरलेली मुले रडू लागली.

आजूबाजूला काेणी नसल्याने झाली घटना आर्यनच्या घरी कळवण्यासाठी वेगाने पळत सुटली. अग्निशमन पथकातील जवानांनी पाण्यात उतरून अर्धा तास शाेध घेतल्यानंतर आर्यनचा मृतदेह हाती लागला. उत्तरीय तपासणी केल्यानंतर दातली या गावी आर्यनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एच. पी. गॅस कंपनीत काम करणारे विलास नवाळे दातली येथील रहिवासी असून, दाेन मुले व पत्नीसह ते नायगाव रस्त्यावर राहतात.
थोडे नवीन जरा जुने