पैसे वाचवणं हे वाटत तितक अवघड मुळीच नसतं ; पण...


पैसे वाचवणं हे वाटत तितक अवघड मुळीच नसतं ; पण त्यसाठी निश्चय मात्र हवाच म्हणजे, उत्पन्न मर्यादित असेल तर, आपल्याला आत्ता मिळते आहे त्याच उत्पन्नात आपण गरजा पूर्ण करणं किंवा गरजाच कमी करणं, असे दोन पर्याय समोर असतात पूर्वीच्या काळी पैसे हाती येत नसत तेव्हा लोक एखाद्या गोष्टीची खरेदी पुढे ढकलत असत. 


जी गोष्ट आज खरेदी करावीशी वाटते. तीच काही काळानंतर, हाती पैसे आल्यानंतर वगैरे खरेदी केली जाई मात्र, हे प्रमाण गेल्या काही काळात फारच कमी झाल्यासारखं वाटतंय म्हणजे, हातात पैसे असतात, त्यामुळे ते खर्चही होतात पण पैसा जपून वापरणा-या लोकांकडून याबाबत काही तरी शिकलं पाहिजे. 

ज्या वस्तूची तातडीने गरज नाही, ती गोष्ट किंवा वस्तू ही आजच्या आजच खरेदी करण्यापेक्षा ती आठवडाभर उशिरा, पुढच्या पगारात, जुनी येणी वसूल झाल्यानंतर वगैरे वगैरे कालावधीपर्यंत पुढे ढकलता आली तर त्याक्षणी खिशावर येणारा ताण, काही प्रमाणात का होईना पण हलका होतोच म्हणजेच, त्याक्षणी वाचलेले पैसे हे इतर अत्यंत महत्त्वाच्या गरजेसाठी खर्च करता येऊ शकतात, त्यातून थोडासा फायदाही होतो आणि त्या खर्चाचं दडपणही येत नाही. बघा, विचार करून. 
थोडे नवीन जरा जुने