जेवण चवदार आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी कडीपत्याचा असा करा वापर !

जेवण चवदार आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी कडीपत्याचा वापर होतो हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे मात्र कडीपत्याचे इतरही अनेक फायदे आहेत त्यांविषयी तुम्हाला किती माहिती आहे. 


कडीपत्याचेच आणखी काही अत्यंत महत्वाचे फायदे पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. याचा तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

कडीपत्ता जेवणाबरोबरच आपल्या त्वचेसाठी व केसांसाठी फायदेशीर आहे असे अनेक तज्ञ लोकांचे म्हणणे आहे.कडीपत्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न आणि फॉलीक ऍसिड असते. हे दोन घटक मिळून शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या पोषक तत्वाचे काम करते. या कारणाने शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होण्यापासून वाचवते.

कोणत्याही कारणाने जर तुमचे लिव्हर खराब झाले असेल तर कडीपत्ता तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. कडीपत्यात असणारे व्हिटॅमिन सी आणि ए लिव्हर दुरुस्त करण्यास मदत करते. कडीपत्ता रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. सोबतच आपली पचनक्रिया सुधारण्याचे देखील काम करते.

याचबरोबर कडीपत्ता कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे महत्वाचे काम करते. कडीपत्ता आपल्या शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवते. ज्यामुळे आपल्याला हृदयाच्या आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. कडीपत्ता कब्ज सारख्या अजारांपाऊन आपल्याला दूर ठेवते.

केस पांढरे होऊ न देणे केस गळू न देणे हे कडीपत्याचे सर्वात मोठे फायदे आहेत. दररोज सकाळी उपाशीपोटी कडीपत्याचे 10-12 पाने खाल्यास युरिक ऍसिडवर कंट्रोल ठेवता येतो.
थोडे नवीन जरा जुने