आयुर्वेदातील 'हे' उपचार दाढी वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतील !


तरूणांमध्ये सध्या दाढी ठेवण्याचा ट्रेंड चांगलाच वाढला आहे. पण प्रत्येकाला हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. कारण प्रत्येकालाच दाट दाढी येत नाही. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हवा तसा लूक ठेवता येत नाही. 


त्यामुळे अनेकांचा हिरमूस होतो. दाढी न वाढण्याची विविध कारणे आहेत. त्यातील महत्वाची कारणे म्हणजे हार्मोन बॅलन्स बिघडणे, स्मोकिंग असू शकतात. 


मात्र आयुर्वेदात असे काही उपचार आहेत ज्यामुळे दाढी वाढवण्यास तुम्हाला मदत करु शकतात.

रोज रात्री कच्चे दूध दाढीवर लावून झोपा. यामुळे केसांची वाढ होईल.


नारळाच्या तेलात ५-६ कढिपत्त्याची पाने टाकून ते गरम करा. त्यानंतर या तेलाने दाढीला मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवा.


नियमितपणे गाजराचा ज्यूस घ्या अथवा डाएटमध्ये गाजराचा समावेश करा.

थोडीशी काळी मिरी पावडर, मध आणि लिंबूचे मिश्रण करुन चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

चेहऱ्याला नियमितपणे १०-१५ मिनिटे आवळ्याच्या तेलाने मसाज करा. यामुळे त्वचा मुलायम होईलच तसेच दाढी वाढेल.
थोडे नवीन जरा जुने