प्रियकराने दिला लग्नास नकार प्रेयसीने केली आत्महत्या !


नागपूर : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची घटना नागपूर मध्ये घडली आहे.

या तरुणीचा तिच्या गावातीलच एका तरुणावर जीव जडला. प्रेमात लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर अचानक प्रियकराने लग्नास नकार दिला. त्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या प्रेयसीने घरातील उंदीर मारण्याचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.उमेश्वरी सदनलाल कोहरे (२७, रा. गितानगर, मानेवाडा, नागपूर) असे मृतक प्रेयसीचे नाव आहे. उमेश्वरची बालाघाट (मध्यप्रदेश) येथील किरणापूर येथील दीपक रामदयाल अंबाडरे (२६) नावाच्या तरुणावर प्रेम होते. तोसुद्धा तिच्यावर प्रेम करीत होता. बरीच महिने त्यांचे प्रेमप्रकरण चालले. दोघांच्याही कुटुंबीयांना हा प्रकार माहित होता. दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा ठाम निश्चय केला होता.येत्या उन्हाळ्यात लग्न करण्याचे दोघांनी ठरविले, पण अचानक प्रियकर दीपक अंबाडरे याने ५ जानेवारी २०२० रोजी प्रेयसीचा भाऊ शिवकृपा कोहरेच्या मोबाइलवर कॉल करून तिच्या आईसोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली. 

मुलाने आईला फोन दिला असता, त्याने त्यांना स्पष्टपणे उमेश्वरीच्या लग्नाकरिता दुसरा मुलगा बघण्यास सांगितले. त्यांनी त्याला कारण विचारले असता, त्याने सांगितले नाही. ही बाब जेव्हा उमेश्वरीला कळली तेव्हा तिने दीपकशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कॉल अटेंड केला नाही. या प्रकारामुळे मानसिकरित्या खचलेल्या उमेश्वरीने घरातील उंदीर मारण्याचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
थोडे नवीन जरा जुने