वैवाहिक जीवन सुखी करायचे असेल तर या गोष्टींकडे लक्ष दिलेच पाहिजे !


एखाद्या गोष्टीचा पाया ठिसूळ असेल किंवा असत्यावर आधारलेला असेल तर त्या गोष्टीचा नाश व्हायला वेळ लागत नाही.
एखाद्या गोष्टीचा पाया ठिसूळ असेल किंवा असत्यावर आधारलेला असेल तर त्या गोष्टीचा नाश व्हायला वेळ लागत नाही. नातेसंबंधांचेही असेच आहे. नात्यात निरसता येऊन नवरा बायकोत निराशा येण्यामागेही हेच कारण आहे. वैवाहिक जीवनात या समस्या सर्रास आढळून येत आहेत.


अधिकांश विवाहित जोडप्यांत छोट्या छोट्या गोष्टींवरून कलह होणे आता नवलाचे राहिलेले नाही. परंतु काही वेळा याचे रूपांतर मन विदीर्ण होण्यात होऊ शकते. याने जीवनातील सुख हरवून जाऊ शकते.

साधारणपणे या भांडणामागे आपसातील सामंजस्य कमी असणे हे कारण असते. सामंजस्य नसण्यामागे दोघांचाही कामाचा वाढता व्याप कारण असू शकेल. नवरा दिवसभर ऑफिस आणि बाहेरच्या कामांत इतका व्यस्त असतो की घरी आल्या आल्या त्याला थकल्यासारखे होते. बायको घरातील कामांत बुडालेली असते. नवरा बायको दोघेही नोकरी करीत असतील तर भांडण होण्याचे प्रमाण अधिक असते.

या भांडणांपासून सुटक होण्यासाठी आणि वैवाहिक जीवनात सुख समाधान नांदण्यासाठी योगीक जीवनशैलीचा अंगीकार करणे खूप महत्त्वाचे आहे. 

- नियमीत योग केल्याने दिवसभर मनाची शांतता टिकून राहते.

- काम करण्याची क्षमता वाढते. दिवसभर ऊर्जा टिकून राहते. 

- आरोग्य चांगले राहते. 

- मन शांत राहिले म्हणजे जोडीदाराशी सामंजस्य आपोआपच निर्माण होते. 

- अनेकदा भांडणाच्या मुळाशी क्रोध असतो. योगामुळे क्रोध नियंत्रणात राहतो.

- ध्यानात ठेवा योग म्हणजे केवळ योगासन नव्हे; यम, नियम, योगासन, प्राणायाम आदी संकल्पनांचा अभ्यासही महत्त्वाचा आहे.
थोडे नवीन जरा जुने